Tarun Bharat

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांचेही होणार निदान; ‘रॉश’ ला अमेरिकेची परवानगी

ऑनलाईन टीम / झ्युरिच : 

कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे निदान आता स्वित्झर्लंडची ‘रॉश’ कंपनी करणार आहे. रॉश ही स्वित्झर्लंडची फार्मस्युटिकल कंपनी असून, तिला अँटीबॉडी चाचणी करण्याची परवानगी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. रॉशचे डायग्नोस्टिक्स प्रमुख थॉमस शिनेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

शिनेकर यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा संसर्ग झालेले आणि कोरोनाचा संसर्ग होऊनही कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांचे निदान रॉश कंपनी अँटीबॉडी चाचणीद्वारे करते. वर्षाअखेरपर्यंत या चाचणीचे उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा मानस आहे.प्रतिमहिना ही कंपनी 5 कोटीऐवजी 10 कोटी चाचण्यांचे उत्पादन करेल.

जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने त्यांना ओळखणे कठीण झाले आहे. कोविड-19 चे संक्रमण ओळखण्यासाठी मॉलिक्युलर चाचणीही करण्यात येणार आहे. अँटीबॉडी चाचणीच्या अचूकतेचा दर 99.8% टक्के असून, सेन्सिटिव्हिटी 100 टक्के आहे. त्यामुळे चाचणीचे निष्कर्ष फार कमी वेळा चुकतात. या चाचणीसाठी माणसांच्या शिरेतून रक्त घेतले जाते.

Related Stories

शांघायमधून रवाना होणार ‘वंडर ऑफ द सीज’

Patil_p

रशियामधून त्वरित बाहेर पडा!

Patil_p

PFI विरोधात पनवेलमध्ये मोठी कारवाई; सचिवासह दोन सदस्यांना घेतलं ताब्यात

Archana Banage

अमेरिकेत मंकीपॉक्सचे 200 रुण -प्रशासन झालं सतर्क

Patil_p

बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन; थोरतांच्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

दिल्लीत मागील 24 तासात 2,260 नवीन कोरोना रुग्ण; संसर्ग दर 3 टक्क्यांवर

Tousif Mujawar