Tarun Bharat

लक्षणे नसलेल्या रुग्णांवर होणार स्वतंत्र उपचार

हालभांवी येथील निवासी शाळेत 80 खाटांची व्यवस्था

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोनाची लक्षणे नसणाऱया बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. वंटमुरीजवळील हालभांवी येथे असलेल्या मुरारजी देसाई निवासी शाळेत यासाठी 80 खाटांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.

गुरुवारी इतर अधिकाऱयांसह जिल्हाधिकाऱयांनी स्वतः या निवासी शाळेला भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. ज्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तरीही त्यांच्यात लक्षणे दिसून येत नाहीत अशा रुग्णांवर या निवासी शाळेत उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांच्यावर अधिक उपचाराची गरज आहे त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या व कोरोनाची लक्षणे नसलेल्या बाधितांना गुरुवारपासूनच या निवासी शाळेत हलविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यापुढे नव्याने दाखल होणाऱया बाधितांना थेट निवासी शाळेत दाखल करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

Related Stories

ता.पं.कार्यकारी अधिकारी रात्री शिकवितात तेंव्हा

Patil_p

निपाणी बसस्थानक परिसरातील 5 दुकाने फोडली

Omkar B

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह

Amit Kulkarni

पाणी गळतीच्या ठिकाणी ट्रक रुतला

Amit Kulkarni

सुरक्षा उपकरणांसाठी व्यापाऱयांना नोटीस

Patil_p

वाढवलेली वीज दरवाढ तातडीने मागे घ्या

Patil_p