Tarun Bharat

लक्ष्मीपूजनाची सर्वत्र धामधूम

विद्युत रोषणाईचा लखलखाट, रंगीबेरंगी रांगोळय़ांनी सजले रस्ते : खाते-कीर्द वहींचे पूजन

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनामुळे दिवाळी कशी जाणार या विवंचनेत असताना कोरोनाचा अंधार सारून नव्या उमेदीने शहरवासियांनी लक्ष्मीपूजन करून लक्ष्मीचे स्वागत केले. सायंकाळनंतर सर्वत्र होत असलेल्या लक्ष्मीपूजनाने वातावरण मंगलमय बनले. सर्वत्र विद्युत रोषणाईचा लखलखाट, सर्वत्र रंगीबेरंगी रांगोळय़ांनी सजलेले रस्ते, खाते-कीर्द वहींचे पूजन आणि नव्या व्यवहारांना सुरुवात यामध्ये व्यापारीवर्ग गुंतला होता.

घरगुती पातळीवर आणि व्यवसायाच्या ठिकाणी होणाऱया लक्ष्मीपूजनाची धामधूम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरवषी लक्ष्मीपूजनाने आप्तस्वकीय, स्नेहीजनांना निमंत्रित केले जाते. यंदा मात्र प्रत्येक व्यापारी आणि दुकानदारांनी आणि कुटुंबांनीसुद्धा मोजक्मयाच स्नेहीजनांना निमंत्रित केले. लक्ष्मीपूजन हे उद्योजक आणि व्यावसायिकांच्यादृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. लक्ष्मी ही देवता साऱयांनाच हवी असते. तिचे पूजन करून नवीन वर्षात कोरोना पूर्णपणे हद्दपार होवो आणि यापुढे कोणतेच नैसर्गिक अथवा मानवनिर्मित संकट जगावर न येवो, अशी प्रार्थना सर्वांनीच मनोभावे केली.

दिवसभरात घरोघरी लक्ष्मीपूजन करून नागरिक घराबाहेर पडले. व्यावसायिक ठिकाणी होणाऱया पूजांनाही भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. सायंकाळी ग्राहकांची गर्दी होण्यापूर्वी पूजन उरकून घेण्यावर व्यापाऱयांचा भर होता. दिवाळीचे लक्ष्मीपूजन आणि खाते-कीर्द वहय़ांचे समीकरण अतूट आहे. लक्ष्मी पूजनादिवशी लक्ष्मीच्या प्रतिमेइतक्याच श्रद्धेने खाते-कीर्द वहय़ांचे पूजन केले जाते. यामुळे सर्वत्र खाते-कीर्द पूजन करण्यात येत होते. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला खाते-कीर्द वही खरेदी करून त्यावर जमा-खर्चाचा ताळेबंद मांडला जातो. वहीवर ताळेबंद लिहिण्यापूर्वी वही पूजनाची प्रथा आजही जपण्यात आली आहे. वहय़ांवर ‘शुभ लाभ’ लिहिणे हा शुभ संकेत असल्याचे व्यापारी मानतात.

 लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. सोने, चांदी व नगदी रुपये यांचीही पूजा होते. लक्ष्मीपूजनाने लक्ष्मी प्रसन्न व्हावी आणि तिच्या पावलांनी घरात, व्यापारात समृद्धी यावी, अशी भावना या पूजेमागे आहे. मात्र, लक्ष्मीबरोबरच सरस्वती ही विद्येची देवता प्रसन्न व्हावी म्हणून खाते-कीर्द वहय़ांची तसेच अन्य वहय़ांची या दिवशी पूजा केली गेली. त्यातच नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने सर्वत्रच लगबग सुरू होती.

लक्ष्मीपूजेच्या निमित्ताने बाजारपेठेतही मोठी गर्दी उसळली होती. लक्ष्मीपूजनासाठी पूजा साहित्याची, सोमवारी असणाऱया भाऊबीज आणि पाडव्यासाठी खरेदी उरकून घेण्याचे बेत ठेवून आलेल्या लोकांमुळे बाजारपेठेत पुन्हा गर्दीचा ओघ वाढता राहिला. एकीकडे ही गर्दी अर्थचक्र गतिमान राहण्यासाठी आशादायी ठरली. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती चिंताजनकही ठरली.

वस्त्रप्रावरणे, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी शोरुम्स गर्दीने फुलल्या

वस्त्रप्रावरणे, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांच्या खरेदीसाठीच्या शोरुम्स गर्दीने फुलल्या होत्या. ग्राहक हाच राजा मानून दुकानदार आणि विपेत्यांनी प्रथम त्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले. लक्ष्मीपूजन मोठय़ा श्रद्धेने केले गेले. मात्र त्याचवेळी स्नेहीजनांची अनुपस्थिती अनेकांना तीव्रपणे जाणवली. कोरोनामुळे एक वर्ष सण-उत्सव यांच्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, पुढील वषी दुप्पट उत्साहाने सर्व जण मिळून सण साजरे करू, असा आशावादही व्यक्त झाला.   

Related Stories

कल्लोळ बंधाऱयावरून धोकादायक वाहतूक

Omkar B

श्रावण सोमवार

Patil_p

खानापूर रोडवर वाहतूक कोंडी

Omkar B

खडेबाजार येथील अंबाबाई मंदिरात चोरी

Amit Kulkarni

चाकूहल्ला प्रकरणी तरुणाला अटक

Patil_p

कुमारस्वामी लेआऊटमध्ये कोविड केअर सेंटर

Patil_p