Tarun Bharat

लक्ष्य सेन, श्रीकांत यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

वृत्त संस्था/ सेरब्रुकेन (जर्मनी)

येथे सुरू असलेल्या हायलो खुल्या सुपर 500 पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यांचे एकेरीतील आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.

शनिवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंगापूरच्या 39 व्या मानांकित लो कीन येवीने भारताच्या 21 व्या मानांकित लक्ष्य सेनचा 21-18, 21-12 अशा सरळ गेम्स्मध्ये 45 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

दुसऱया एका सामन्यात मालेशियाच्या दुसऱया मानांकित लि झियाने भारताच्या किदांबी श्रीकांतवर 21-19, 22-20 असा निसटता विजय नोंदवित अंतिम फेरी गाठली. लक्ष्य सेन या स्पर्धेतील माजी विजेता होता. 2019 बॅडमिंटन हंगामात 20 वर्षीय लक्ष्य सेनने पाच स्पर्धां जिंकल्या. पण, या हंगामात त्याची कामगिरी समाधानकारक झाली नाही. डेन्मार्क खुल्या स्पर्धेत तसेच प्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनला अनुक्रमे दुसऱया आणि उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता.

Related Stories

रणजी क्रिकेटपटूंना पन्नास टक्के भरपाई देण्याची शिफारस

Patil_p

गोलंदाज प्रशिक्षकपदासाठी पारस म्हांब्रे इच्छुक

Patil_p

प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाचा सहभाग

Patil_p

सेरेना, मेदवेदेव्ह, किर्गीओस, गॉफ तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

स्वायटेक, नदाल विश्वविजेते

Patil_p

वॉर्नरचे सहकाऱयांना आवाहन

Patil_p