Tarun Bharat

लखनऊमध्ये एटीएसने दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या

ऑनलाईन टीम / लखनौ

गेल्या काही दिवसांपासून देशात अनेक ठीकाणी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. जम्मु काश्मिरमध्ये सरकारने आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाऊद्दीन याच्या दोन्ही मुलांना दहशतवाद्यांशी हितसंबंध आणि वित्तसंबध असल्याचा आरोप ठेवत सरकारी नोकरीवरुन निलंबित केले आहे. अशीच कारवाई उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊमध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस ) केली.

लखनऊमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर एटीएसच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला वेढा घालत कारवाई करण्यात आली. यावेळी अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. हे दोन्ही हस्तक पाकिस्तानी असून त्यांना पकडण्यात एटीएसला यश आले आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात स्फोटके ही जप्त केली असुन, घातपाताचा मोठा कट उधळला असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

सकाळी दहा वाजता ही कारवाई सुरु केली होती ती बराच वेळ सूरु होती. या कारवाई दरम्यान काकोरी पोलीसांनी संशयित परिसरातील नागरी परिसर पिंजून काढला असून काही घरे रिकामी ही केली होती.

Related Stories

इंधन दरवाढ; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

Archana Banage

विजय मल्ल्यांना ‘सर्वोच्च’ झटका

Patil_p

मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत; नारायण राणेंचा गौप्यस्फोट

Archana Banage

निर्भया : राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला, फाशी निश्चित

prashant_c

अत्याचार प्रकरणातील संशयिताला जिवंत जाळले

Amit Kulkarni

24 जूनला ब्रिक्सची व्हर्च्युअल परिषद

Patil_p