Tarun Bharat

लग्न सोहळयास जाणार्‍या स्कार्पिओ गाडीस ब्रम्हपुरीजवळ अपघात; आठ प्रवाशी जखमी

Advertisements

तरुण भारत संवाद

मंगळवेढा/वार्ताहर

लग्न सोहळयास जाणार्‍या स्कार्पिओ गाडीचा अपघात झाल्याने आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना सोलापूर येथील सी.एन.एस. हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात स्कार्पिओ चालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला असून हा अपघात बुधवारी सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरीजवळ घडला.

रावसाहेब नागणे, संगिता नागणे, महेश नागणे, कमल नागणे, विराज कोंडुभैरी, ताई कोंडुभैरी, कलावती गोवे, विठ्ठल नागणे अशी जखमींची नावे आहेत. हे सर्व नागणे कुटुंब मोहोळमध्ये लग्नकार्यासाठी जात असताना हा अपघात घडला.

यातील फिर्यादी चन्नपा डबरे हे ट्रक नंबर (केए-28- बीओ-211) या गाडीवर चालक म्हणून आहे. आज पहाटे चार वाजता सेडम जिल्हा गुलबर्गा येथून बिर्ला सिमेंट कंपनीतून सिमेंट भरून हा ट्रक मंगळवेढा येथील चाळीस धोंडा येथे निघाला होता. ब्रम्हपुरीपासून पुढे 3 कि.मी. अंतरावरील तुकाराम महाराज मंदिराजवळ आल्यानंतर रोडचे काम चालू असल्याने ट्रक उजवीकडच्या बाजूने डाव्या बाजूला रोडवर ट्रक घेत असताना मंगळवेढयाकडून स्कार्पिओ गाडी क्र.(एमएच-13 –एझेड -8793) ही वेगात आल्याने स्कार्पिओची ट्रकला जोराची धडक झाली. यात आठ जण गंभीर जखमी झाले. या अपघाताचा अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.

Related Stories

सोलापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने शासकीय आदेशाची होळी

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात मास्कची सक्ती करा – पालकमंत्री

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात 31 पॉझिटिव्ह तर चार मृत्यू

Abhijeet Shinde

निसर्गाकडे आपण कसे पाहतो, त्यावर आपले यश अवलंबून

prashant_c

करमाळ्यातील पुनर्वसन, भूसंपादन संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन

Abhijeet Shinde

सोलापूर : करमाळ्यात शिवसेनेची ऑक्सिजन बँक सुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!