Tarun Bharat

लग्न सोहळय़ांच्या परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात गर्दी

Advertisements

विकेंड कर्फ्यूमुळे सोमवारी पास मिळविण्यासाठी वधू-वर पक्षमंडळीची दिवसभर झुंबड

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. शिवाय कार्यक्रम व लग्न समारंभांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. तालुक्मयातील नागरिकांना विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी तहसीलदार कार्यालयात परवानगी (पास) दिली जात आहे. पास मिळविण्याकरिता संबंधित नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. शासनाच्या नियमानुसार शनिवार व रविवारी विकेंड कर्फ्यूमुळे दोन दिवस तहसीलदार कार्यालय बंद होते. त्यामुळे विवाह सोहळय़ांसाठी देण्यात येणाऱया पासचे काम देखील थांबले होते. त्यामुळे सोमवारी पास मिळविण्यासाठी वधू व वर पक्षमंडळींनी दिवसभर गर्दी केली होती.

अर्ज करताना संबंधितांना सोहळा समारंभाची किंवा कार्यक्रमाची तारीख, स्थळ व पत्ता नमूद करावा लागत आहे. शिवाय निमंत्रण पत्रिकेची प्रत, घरमालक-कार्यालय मालकाचे संमतीपत्र व त्यांचे आधारकार्ड अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर संबंधित अर्जाची छाननी करून काही वेळानंतर अनुमती पत्र देण्यात येत आहे. शिवाय परवानगीनुसार जे 50 जण लग्न सोहळय़ाला उपस्थित राहणार आहेत अशा 50 जणांची नावे व मोबाईल नंबर देणेदेखील आवश्यक आहे. 

 प्रशासनाने विवाह सोहळय़ाला परवानगीची अट घातल्याने तहसीलदार कार्यालयात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे कार्यालयात पास मिळविण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कडक निर्बंध लागू केले आहेत.

Related Stories

गणोत्सव आज होणार झी म्युझिक मराठीवर प्रदर्शित

Patil_p

शहर म.ए.समितीतर्फे हुतात्म्यांना आदरांजली

Omkar B

मुडेवाडी प्राथमिक शाळेच्या इमारतीची भिंत पावसामुळे कोसळली

Rohan_P

तिन्ही भाषांमधून परिपत्रके द्या

Amit Kulkarni

विक्रमी वसुलीतून निपाणी पालिकेची दिवाळी

Omkar B

जिल्हय़ात बर्ड-फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय

Patil_p
error: Content is protected !!