Tarun Bharat

लज्जत किवी -व्हेनिला स्मूदीची

उन्हाळा सुरू झाला आहे. या दिवसात कुटुंबातल्या प्रत्येकालाच गारेगार खावंसं वाटतं. मग आईसक्रीम, सरबतं, ताक, लस्सी यांचा पर्याय निवडला जातो. त्यातच  काहीतरी वेगळं ट्राय करावंसं वाटतं. तुम्हीही  चविष्ट, आरोग्यदायी आणि गारेगार पेयं घरच्या घरी तयार करू शकता. किवी व्हॅनिला स्मूदी हा उन्हाळ्यातल मस्त पर्याय ठरू शकतो. अवघ्या काही मिनिटात तयार होणारं हे पेयं मुलांसह प्रत्येकाला आवडेल असंच आहे. किवी व्हॅनिला स्मूदी रेसिपी खास तुमच्यासाठी…

साहित्य :  सहा कप दही, चार किवी,  व्हॅनिला आईसक्रीम, 6 टेबलस्पून साखर, पुदिन्याचं पानं, बर्फ कृतीः किवीची सालं काढून गराचे चौकोनी तुकडे करून घ्या. एका भांडय़ामध्ये दही काढून घ्या. चमच्याने फेटून घ्या. यानंतर दही, किवीचे तुकडे आणि साखर ज्यूसर किंवा ब्लेंडर जारमध्ये घाला. हे मिश्रण ब्लेंड करून घ्या. आता त्यात बर्फाचे तुकडे आणि व्हॅनिला आईसक्रीम घाला आणि ब्लेंड करा. स्मूदी तयार. ही स्मूदी काचेच्या ग्लासमध्ये ओता. त्यावर पुदीन्याच्या पानांची सजावट करा. गारेगार प्यायला द्या.

Related Stories

मालवणी काजू करी

Omkar B

मस्त मिल्क केक

Omkar B

कापोली वडा पाव

Omkar B

चटपटीत पालक चना सूप

Amit Kulkarni

मँगो करी

Omkar B

लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी खमंग काजू बर्फी

Kalyani Amanagi
error: Content is protected !!