Tarun Bharat

लडाखमध्ये चिनी हवाई दलाचा युद्धसराव

ऑनलाईन टीम / लडाख : 

कडाक्याच्या थंडीमुळे दोनच दिवसांपूर्वी चीनने पूर्व लडाखमधून 90 टक्के माघारी बोलावले होते. त्यानंतर चीनने पुन्हा एकदा आपली त्याठिकाणची तैनाती वाढवली असून, आज भारतीय हद्दीजवळ चिनी हवाई दलाने युद्धसराव केला.  

एका वृत्तसंस्थेनेनुसार, पूर्व लडाखमध्ये भारतीय हद्दीजवळ मागील वर्षी ज्या एअरबेसवरुन चीनने लडाखमध्ये आपल्या सैनिकांना मदत पोहोचवली होती, त्याच एअरबेसवरून आज चिनी हवाई दलाच्या 20 हून अधिक लढाऊ विमानांनी युद्धसराव केला. त्यानंतर भारतीय हवाई दलही सक्रिय झाले असून, चिनी हद्दीतील काशगर, होतान, न्यगिची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअरबेसवर भारताची नजर आहे. उत्तरेकडील सीमेवर भारताने राफेलसह  अन्य लढाऊ विमानांचा ताफाही सक्रिय केला आहे.

Related Stories

कलम ३७० हटवल्यानंत्तर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू काश्मीर दौऱ्यावर

Archana Banage

नाना पटोलेंवर अजित पवार भडकले; म्हणाले…

Tousif Mujawar

हिमाचलमध्ये 8 शहरात तापमान ‘शून्या’खाली

Patil_p

बाळासाहेब ठाकरे आजही लाखों लोकांसाठी प्रेरणादायीच : नरेंद्र मोदी

prashant_c

कोलकाता : सीपीआयचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचे निधन

Tousif Mujawar

जवानांना आता वज्र अन् त्रिशूळाचाही आधार

datta jadhav