Tarun Bharat

ललित – सईची कलरफुल लव्हस्टोरी

Advertisements

लॉकडाऊन नंतर चित्रपटगफह आता उघडली जात असताना अनेक नवनवीन चित्रपटाची घोषणा या काळात होत आहे. प्रयोगशील आणि गुणी म्हणून ज्यांची दखल संपूर्ण चित्रपटसफष्टीने घेतली आहे असा दिग्दर्शक प्रकाश कुंटे आणि मूळची हिंदी निर्माती मानसी तसेच यंत्रा पिक्चर्सची निर्मिती असलेला रोमँटिक कलरफुल या चित्रपटाची घोषणा नुकतीच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करून केली.

नवनवीन आणि साध्या विषयांवर प्रतिभावन कलाकृतीला घडवणारा दिग्दर्शक प्रकाश कुंटे कलरफुल हा रंगानी भरलेला चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले असून या पोस्टरमध्ये एक जोडपं रंगबेरंगी फुलांच्या संगतीने बसलेले दिसतात, हे जोडपं नेमकं कोण हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. करण आणि मीरा हे त्या प्रश्नाचं उत्तर असून या दोघांची ही कथा आहे. कलरफुलच्या निमित्ताने रंगाने भरलेली लव्हस्टोरी बघायला मिळणार असून या चित्रपटात करणची भूमिका ललित प्रभाकर तर सई ताम्हणकर मीराची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक प्रकाश कुंटे त्याच्या या नवीन जोडी विषयी सांगतो, ललित आणि सई हे दोघेही गुणी कलाकार आहेत, दोघांचं काम मी पाहिलं आणि अनुभवलं सुद्धा आहे, या सगळय़ात करण – मीरा हे दोघेच साकारू शकतील या बाबत मी ठाम होतो, सई आणि ललित या दोघांची पात्र जरी वेगळी असली तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे.

Related Stories

‘येऊ कशी तशी मी नांदायला’चा ऍक्शनपॅक्ड आठवडा

Patil_p

पूनम ढिल्लोंची मुलगी पलोमा करणार पदार्पण

Patil_p

विवादानंतर कंगनाला उपरती; कंगना म्हणाली…

Tousif Mujawar

यशोदामध्ये ‘स्टंट’ करताना दिसणार समांथा

Patil_p

अपयशाला घाबरू नका : मलायका

Patil_p

राज ठाकरे यांच्या हस्ते 8 दोन 75

Patil_p
error: Content is protected !!