Tarun Bharat

लवलिना बोर्गोहेनची विजयी सलामी

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंस्तबुलमध्ये सुरू असलेल्या आयबीए महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत  भारताची टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेनने 70 किलो वजनगटात चीन तैपेईच्या चेन निएन चिनचा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूंमध्ये प्रवेश मिळविला.

गेल्यावर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतर लवलिना बोर्गोहेनने आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुष्टीयुद्ध स्पर्धेत पहिल्यांदाच आपला सहभाग दर्शविला. सोमवारी महिलांच्या 70 किलो लाईट मिडलवेट गटातील लढतीत लवलिनाने चीन तैपेईच्या चिनचा 3-2 अशा गुणांनी पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. 2018 साली झालेल्या या स्पर्धेत  लवलिनाला उपांत्य फेरीत चिनने पराभूत केले होते. लवलिनाचा चेन चिनवरील हा दुसरा विजय आहे. आसामच्या 24 वर्षीय लवलिनाने 2018 आणि 2019 साली झालेल्या महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळविली होती. तिचा या स्पर्धेतील पुढील फेरीतील सामना इंग्लंडच्या सिंडाय निगेंबाशी होणार आहे.

या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी 48 किलो वजनगटात भारताच्या नीतूचा सलामीचा सामना रूमानियाच्या डुटाशी होणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या शिक्षा (54 कि), मनिषा (57 कि), अंकुशिता (66 कि), नंदिनी (81 कि.वरील) यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. 2019 ची महिलांची विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धा रशियामध्ये झाली होती आणि त्यामध्ये भारताने एक रौप्य आणि तीन कांस्यपदके मिळविली होती.

Related Stories

जपानच्या निशीकोरीला कोरोनाची बाधा

Patil_p

इंग्लंड-न्यूझीलंड पहिली कसोटी आजपासून

Amit Kulkarni

रणजीकडे दुर्लक्ष केले तर भारतीय क्रिकेट कणाहिन होईल

Patil_p

ब्रिटनमध्ये सरावाचा निर्णय योग्य ठरला: सिंधू

Patil_p

माझ्या नावाचा वापर अपप्रचारासाठी नको

Amit Kulkarni

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

prashant_c
error: Content is protected !!