Tarun Bharat

लवादांमधील नियुक्त्यांकरता 2 आठवडय़ांची मुदत

Advertisements

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी – केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाच्या विविध लवादांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर नियुक्त्यांवरून केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने विविध लवादांमध्ये नियुक्त्यांवरून सरकारला दोन आठवडय़ांची मुदत दिली आहे. ट्रिब्युनल रिफॉर्म्स ऍक्ट-2021 ची घटनात्मक वैधता आणि लवादांमधील रिक्त पदांशी संबधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी झाली.

विविध लवादांमध्ये नियुक्त्यांसाठी निवड समितीच्या शिफारसींवर केंद्र सरकारने ज्याप्रकारे काम केले, त्याबाबत आम्ही समाधानी नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी 6 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

लवादांमध्ये किती नियुक्त्या केल्या याची विचारणा यापूर्वीही केली आहे. तुम्ही आमच्या संयमाची परीक्षा घेत आहात. आमच्याकडे तीन पर्याय आहेत, कायद्याला स्थगिती देणे पहिला, लवादांमध्ये आम्हीच नियुक्त्या करणे, त्यानंतर सरकार विरोधात अवमानाची कारवाई सुरू करणे ही 3 पर्याय असल्याचे सरन्यायाधीशांनी मागील सुनावणीवेळी म्हटले होते.

Related Stories

तामिळनाडूत ‘100 टक्के सिद्ध’ उपचाराचा दावा

Patil_p

बारावीचा निकष सर्वोच्च न्यायालयाला मान्य

Patil_p

अरुणाचल प्रदेशात वसवलं अख्ख गाव; चीनची कुरापत

Abhijeet Khandekar

‘मन की बात’ मध्ये नद्यांच्या संरक्षणावर भर

Patil_p

2019 मध्ये दर 4 मिनिटात एकाची आत्महत्या

Patil_p

राहुल गांधींना ईडीकडून 13 जूनपर्यंतची मुदत

Patil_p
error: Content is protected !!