Tarun Bharat

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यांतर्गत उत्तर प्रदेशात पहिली तक्रार दाखल

Advertisements

लखनौ / वृत्तसंस्था

बेकायदेशीर पद्धतीने धर्मपरिवर्तनाला विरोध करणारा ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा नुकताच उत्तर प्रदेशात संमत करण्यात आला आहे. या कायद्यान्वये उत्तर प्रदेशातील बरेली येथील देवरनिया येथे पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील एका तरुणाविरुद्ध महिलेला फूस लावून तिचे धर्मपरिवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी धर्म परिवर्तनविरोधी अधिनियम 3/5 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनुसार, उबैस नावाच्या तरुणावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव आणल्याचा तसेच फूस लावून धर्म परिवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. उबैस सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशात कथित लव्ह जिहाद प्रकरणांविरोधात योगी आदित्यनाथ सरकारच्या अध्यादेशाला राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी मंजुरी दिली. यानंतर राज्यात लव्ह जिहाद कायदा लागू झाला आहे.

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यानुसार, जबरदस्ती करून, आमिष दाखवून झालेले धर्मांतर हा अजामीनपात्र गुन्हा ठरेल. या कायद्याच्या उल्लंघनाने कमीतकमी 15 हजार रुपयांचा दंड आणि पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होईल. सदर गुन्हा अल्पवयीन मुलगी अथवा अनुसूचित जाती-जमातीच्या मुलीसोबत केल्यास कमीतकमी 25 हजार रुपयांचा दंड आणि 3 ते 10 वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची तरतूद नव्या कायद्यात अंतर्भूत आहे. तसेच बेकायदेशीर सामूहिक धर्म परिवर्तनासाठी कमीतकमी 50 हजार रुपये दंड आणि 3 ते 10 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

Related Stories

मध्यप्रदेशातील शहडोल, अनुपपूरमध्ये भूकंपाचे धक्के

datta jadhav

भारत-पाक सीमेवर घुसखोराला कंठस्नान

Patil_p

दिल्लीत सायकल मार्केटमध्ये अग्नितांडव

Patil_p

देशात 66,999 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

अमरनाथ यात्रेबाबत संभ्रम कायम

prashant_c

पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात भाजपची कसोटी

Patil_p
error: Content is protected !!