Tarun Bharat

लष्कराच्या इंजिनिअर्सनी 72 तासात गलवान नदीवर उभारला पूल

ऑनलाईन टीम / लडाख : 

भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सनी रणनितीक दृष्टीने लडाखमधील गलवान नदीवर अत्यंत वेगाने पूल बांधला आहे. 60 मीटर लांबीचा हा पूल 72 तासात उभारण्यात आला असून, या पुलामुळे लष्कराच्या तुकड्यांना वेगात नियंत्रण रेषेजवळ पोहचता येणार आहे.

गलवान खोऱ्यात 15 जूनच्या रात्री भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. मंगळवरीही हा संघर्ष झाला. मात्र, अशा काळातही भारतीय लष्कराने रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या या पुलाचे बांधकाम हाती घेतले. गुरुवारी दुपारी हा पूल बांधून पूर्ण झाला. दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.

लष्कराच्या कारु स्थित माऊंटन डिव्हिजनने लष्कराच्या इंजिनिअर्सच्या युनिटला अजिबात विलंब न लावता लवकरात लवकर या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. या पुलामुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार असल्याने हा पूल उभारायला चीनचा विरोध होता. मात्र, चीनला न जुमानता लष्कराच्या इंजिअर्सनी हा पूल पूर्ण केला.

Related Stories

प्रत्येकाला मिळणार आरोग्य ओळखपत्र

Amit Kulkarni

232 चिनी ऍप्सवर कारवाईची कुऱहाड

Patil_p

वांगी येथे शेतकऱ्यांचा महावितरण विरोधात रास्तारोको

Archana Banage

नितीन गडकरींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

datta jadhav

विकलांगांना धक्काबुक्की..!

Rohit Salunke

चित्रा वाघ ‘उर्फी’ विऱोधात आक्रमक; महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर सवाल

Abhijeet Khandekar