Tarun Bharat

लष्कर-ए-मुस्तफा दहशतवादी संघटनेचा प्रमुख जेरबंद

Advertisements

मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता दहशतवादी- पोलिसांना मोठे यश

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मूच्या पुंजवानी भागातून पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली आहे.  शोपियांचा रहिवासी असलेला हिदायतुल्ला मलिक हा लष्कर-ए-मुस्तफा या नव्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. हिदायतुल्लाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काही ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवाद्यासोबत एक महिलाही उपस्थित होती असे समजते. पण दहशतवादी कृत्यात तिचा सहभाग आहे की नाही याचा तपास पोलीस करत आहेत.

लष्कर-ए-मुस्तफाचा प्रमुख जम्मूत आल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीधर पाटील करत यांच्याकडे होते. लष्कर-ए-मुस्तफा ही दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या अधीन काम करते. जम्मूमध्ये हल्ला करण्याच्या तयारीत होतो असे चौकशीत हिदायुतल्लाने सांगितले आहे. हल्ल्यासाठी त्याच्याकडून कट रचला जात होता, हल्ला करण्यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे. 

Related Stories

महाराज सुहेलदेवचे वंशज भाजपमध्ये सामील

Patil_p

वधूचे अनोखे वेडिंग फोटोशूट

Patil_p

हिमाचल प्रदेश : ‘या’ गावात एक व्यक्ती सोडून पूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

परमबीर सिंग, तुम्ही लपलाय कुठे?

Amit Kulkarni

घरोघरी प्रचार, कन्याकुमारीत रोड शो

Patil_p

काश्मीर खोऱ्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान; एकाला जिवंत पकडले

datta jadhav
error: Content is protected !!