Tarun Bharat

लसीकरणासंदर्भात राजकारणाचे प्रकार आता सरकारने थांबवावेत

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची टीका : दुसरा डोस लवकर देण्यासाठी पावले उचला

प्रतिनिधी / मडगाव

लसीकरणाच्या बाबतीत सरकारने राजकारण करण्याचे प्रकार आता थांबवावेत. ‘टीका उत्सव’ सुरू असलेल्या ठिकाणी सेल्फीची सोय करणे म्हणजे तो लग्नसोहळा आहे काय. हे प्रकार लज्जास्पद असून लवकरात लवकर लोकांना लसीचा दुसरा डोस मिळेल यासाठी सरकारने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

फातोर्डातील नाले उपसण्याच्या कामास प्रारंभ केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारने कोविड महामारीवर राजकारण करणे आता बंद करावे. अडीच हजाराहून जास्त गोमंतकीयांचे बळी या महामारीमुळे गेले आहेत, तरी सरकारने सेल्फीसारखे उपक्रम राबवून थट्टा चालविली आहे, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

लसी उपलब्ध नसल्याने दुसरा डोस देण्यास विलंब

सरकारकडे कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्यासाठी आवश्यक डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे 4 आठवडय़ांनी दिला जाणारा दुसरा डोस नंतर 6 व आता 12 आठवडय़ांनी दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विलंबाने लस घेतल्यास जादा अँटीबाँडीज निर्माण होतात यासंदर्भात कोणताही शास्त्राsक्त पुरावा नाही. फक्त लसी उपलब्ध नसल्याने दुसरा डोस देण्यास विलंब होत आहे, असा दावा सरदेसाई यांनी केला. यासंदर्भात निश्चित धोरण आखून गोमंतकीयांना दुसरा डोस त्वरित देण्यासाठी पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, जलस्रोत खात्यामार्फत मोठय़ा नाल्यांची साफसफाई करण्यात येणार असून पालिकेकडून दोन पथके स्थापित करून मडगाव व फातोर्डा व कुडतरीच्या गृहनिर्माण वसाहतीतील गटारांची साफसफाई व अन्य मान्सूनसंदर्भातील कामे मार्गी लावण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कोरोना महामारीमुळे माटोळी बाजारही महागला

Omkar B

राज्यात 75 वा क्रांतिदिन साजरा

Amit Kulkarni

नागरी पुरवठा खात्याचे आवाहन

Patil_p

दिगंबर कामतने जनतेसाठी किती योजना राबविल्या त्या सांगाव्यात

Amit Kulkarni

पाच बांगलादेशींना अटक, पाच स्थानबद्ध

Amit Kulkarni

लॉकडाऊन काळात बेघर झालेल्या वृध्देची वृध्दाश्रमात रवानगी

Omkar B