Tarun Bharat

लसीकरणासंदर्भात राज्यांनीच योग्य नियोजन करण्याची गरज: केंद्रीय आरोग्य मंत्री

नवी दिल्ली/प्रतिनिधी

केंद्र सरकारने देशात गेल्या महिन्यात २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. लस खरेदी करून ती राज्यांना पुरवण्याची जबाबदारी पुन्हा केंद्रानं स्वत:कडे घेतली असून राज्यांनी लसीकरण मोहीम राबवायची आहे. मात्र, त्यानंतर देशाच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लस तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. लसीचा पुरवठा कमी झाल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. मात्र, त्यावर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्राची भूमिका स्पष्ट करत, “जुलैमध्ये किती लसींचे डोस पुरवले जाणार आहेत, याची माहिती राज्यांना आधीच दिलेली आहे. जर राज्यांमध्ये समस्या असेल, तर याचा अर्थ राज्यांना अधिक चांगल्या नियोजनाची गरज आहे”, असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी यासंदर्भात ट्वीट देखील केले आहे.

जुलै महिन्यात राज्यांना मिळणार १२ कोटी डोस
एकीकडे राज्यांमध्ये लसीचा तुटवडा भासत असल्याच्या तक्रारी येत असताना दुसरीकडे राज्यांना १२ कोटी डोस उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. राज्यांना दररोज केंद्राकडून किती लसींचा पुरवठा केला जाईल, याची माहिती १५ दिवस आधी दिली जाते, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यासोबतच, जुलै महिन्यात राज्यांना १२ कोटी डोस उपलब्ध करून दिले जातील, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यांना उपलब्ध करून दिला जाणारा हा साठा खासगी रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या २५ टक्के साठ्याव्यतिरिक्त असेल, असं त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. “केंद्र सरकारने ७५ टक्के लसी मोफत देण्याचं जाहीर केल्यानंतर लसीकरणानं वेग पकडला आणि जून महिन्यात राज्यांना तब्बल ११.५० कोटी डोस पुरवण्यात आले”, असं त्यांनी नमूद केलं आहे.

Related Stories

फेब्रुवारी २०२१ पर्यंत होणार नाहीत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा

datta jadhav

2021 मध्ये केवळ 48 दिवस कुंभमेळा

Patil_p

नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली बिहारची निवडणूक लढणार

Patil_p

भारत-फ्रान्सच्या वायुदलाचा संयुक्त युद्धाभ्यास

Amit Kulkarni

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील यांचे निधन

Archana Banage

लसीकरण मोहीम संपताच ‘सीएए’ची अंमलबजावणी

Amit Kulkarni