Tarun Bharat

लसीकरणासंबंधी गाईडलाईन्स तयार

Advertisements

तारीख राज्ये ठरवणार : केंद्रीय आरोग्य मंत्रालय सूचनांची समीक्षा करणार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोना लस आल्यानंतर पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये देशातील 30 कोटी लोकांना लस टोचण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. यासाठी औषध निर्मिती कंपन्यांकडून 60 कोटी डोस खरेदी केले जाणार आहेत. कोरोना लसीकरणासंदर्भात ‘नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन’ने तपशीलवार मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक विशेष पथक या 112 पानी सूचनांची समीक्षा करणार आहे. त्यानंतर लसीकरण मोहिमेवर शिक्कामोर्तब होईल. या सूचनांनुसार आपापल्या प्रदेशातील लसीकरणाचा दिवस देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ठरवणार आहेत.

देशात सध्या कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून सुरुवातीला एका केंद्रावर फक्त 100 लोकांना लसीचा डोस दिला जाणार आहे. लसीची उपलब्धता आणि तयारी उत्तम झाल्यानंतर ही संख्या 200 पर्यंत वाढवली जाणार आहे. लसीमुळे कोणावरही विपरित परिणाम होत नसल्याची खात्री झाल्यानंतरच मोहिमेला वेग दिला जाणार आहे. कंपन्यांनी तयार केलेली लस साठविण्यासाठी उणे 2 ते 8 अंश सेल्सिअस एवढय़ा क्षमतेच्या कोल्ड स्टोरेजच्या सुविधेची व्यवस्था करण्यात येत असल्याचे ‘नॅशनल ग्रुप ऑफ एक्स्पर्ट ऑन कोविड-19 व्हॅक्सिनेशन’चे चेअरमन आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.

देशात सध्या वेगवेगळय़ा कंपन्यांकडून लसनिर्मितीची प्रक्रिया सुरू आहे. यात सिरम इन्स्टिटय़ूट, भारत बायोटेक, झायडस आणि स्पुटनिकच्या लसींचा समावेश आहे. मात्र, लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने या मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे पॉल यांनी स्पष्ट केले आहे.

एका केंद्रावर दिवसाला फक्त 100 जणांना लस

मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाची प्रक्रिया निवडणुकीसारखी असेल. प्राधान्यानुसार निवडण्यात आलेल्यांनाच लस दिली जाईल. एका केंद्रावर एका सत्रात (दिवसात) 100 पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण होणार नाही. देशात एकूण किती बूथ असतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबत केंद्र सरकारने राज्यांकडून माहिती मागविली आहे. सर्व राज्यांची माहिती मिळताच केंद्र आणि तारखा निश्चित केल्या जाऊ शकतात.

प्रत्यक्ष मोहीमेत पाच जणांचा समावेश

लसीकरणाची प्रक्रिया निवडणुकीसारखी असेल. प्रत्येक लसीकरण पथकात 5 सदस्य असतील. तज्ञ डॉक्टर्स/नर्स, फार्मासिस्ट, एएनएम वा आरोग्यसेवक, पोलीस होमगार्ड, नागरी सेवक, एनसीसी, एनएसएस वा एनवायकेचा एखादा सदस्यही पथकामध्ये समाविष्ट असेल.

Related Stories

लॉकडाऊनमध्ये 31 मे पर्यंत वाढ

Patil_p

कोरोना संसर्गाच्या लक्षणांचा मांडला क्रम

Patil_p

लालूप्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली

Patil_p

ममतांच्या मंत्रिमंडळातून चार जणांना डच्चू

Amit Kulkarni

टोकियो ऑलिम्पिक : भारताच्या पुरूष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक

Abhijeet Shinde

नव्या संसदभवनाच्या कोनशीला समारंभाला मान्यता

Patil_p
error: Content is protected !!