Tarun Bharat

लसीकरणास चालना देण्यासाठी लोकमान्य आरोग्य सन्मान योजनेस प्रारंभ

प्रतिनिधी / बेळगाव

साऱया जगभरात कोविड 19 ने उच्छाद मांडला असून सर्व देश लसीकरण मोहिमेत मग्न आहेत. आपला भारत देशही त्यात मागे नाही. भारतात लसीकरण मोहीम जोरात चालू असून सरकार वारंवार जनतेला लसीकरणासंदर्भात आवाहन करीत असते. 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी लसीकरणात प्राधान्य दिले आहे. पण अजूनही लोकांच्या मनात लसीकरणाबाबत बरेच संभ्रम असून सरकारच्या आवाहनाला सहकार्य देईनात. लोकमान्य सोसायटीच्या कर्मचाऱयांच्या माध्यमातून सर्व सभासदांना व नागरिकांना लसीकरणासाठी दररोज फोन करून प्रोत्साहित करण्यात येत आहे. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीदेखील राष्ट्र निर्मितीत नेहमीच अग्रेसर असते. आपल्या सभासदांच्यात लसीकरण जागृतीसाठी व प्रोत्साहनासाठी   लोकमान्य सोसायटीने लोकमान्य आरोग्य सन्मान योजना अंमलात आणली आहे.

या योजनेत ज्या सभासदांनी व ग्राहकांनी कोविड 19 लस घेतली आहे (पहिला डोस घेतला असेल तरी चालेल) अशा व्यक्तींनाच भाग घेता येईल. सदर योजनेत भाग घेण्यापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक असेल. लोकमान्य आरोग्य सन्मान योजनेत कमीत कमी रु. दहा हजार किंवा त्याहून अधिक एक हजारच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. सभासद याहून अधिक कितीही रक्कम गुंतवू शकतील. या योजनेचा कालावधी 21 महिने असून 9.25 टक्के असा आकर्षक व्याज दर आहे. जे सभासद दहा लाख रुपये एकरकमी गुंतवतील त्यांना 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. लोकमान्य सोसायटी नेहमीच ग्राहकांच्या हिताचा विचार करते. या योजनेत ठेवीवर सुलभ कर्जदेखील मिळते. 

मर्यादित कालावधीसाठीच योजना

ही योजना दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मर्यादित कालावधीसाठीच आहे. तरी ज्या सभासदांनी लसीकरण केले आहे त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा, असे लोकमान्य सोसायटीतर्फे कळविण्यात आले आहे. सदर योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी नजीकच्या लोकमान्य शाखेत संपर्क साधावा.

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी ही भारतातील अग्रगण्य सहकारी संस्था आहे. तिचा विस्तार महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व दिल्लीमध्ये असून 213 शाखा असंख्य ग्राहकांच्या सेवेत सातत्याने कार्यान्वित आहेत.

Related Stories

सरस्वती वाचनालयात ‘नाटय़ानुभव’वर व्याख्यान

Amit Kulkarni

सुवर्णसिंहासनाच्या कर्तव्यनिधीचा ओघ सुरूच

Patil_p

वडगाव येथील बसथांब्यानजीक डेनेज वाहिनी फुटल्याने समस्या

Amit Kulkarni

केएलई स्कूल ऑफ म्युझिकमध्ये संगीत कार्यक्रम

Amit Kulkarni

मतदार यादीतून नाव गायब झाल्याने महिलेची तक्रार

Patil_p

शंकराचार्य रथोत्सवाचा आज मुख्य दिवस

Patil_p