Tarun Bharat

लसीकरण ऑफलाईन सुरू करा!

बांदा सरपंच अक्रम खान यांनी जिल्हाधिकारी, जि.प.अध्यक्षांचे लक्ष वेधले

प्रतिनिधी / बांदा:

शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीचा फटका स्थानिकांना बसत असून नेटवर्क प्रॉब्लेम वारंवार होत असल्याने स्थानिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना रोषाला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्वरित लक्ष देऊन हे लसीकरण ऑफलाईन करावे. जो प्रथम येईल, त्याला प्राधान्य देत स्थानिकांना न्याय देण्याची मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात खान यांनी पुढे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ आहे. बांदा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबिंधक लसीचे डोस उपलब्ध होतात. मात्र, यासाठी ऑनलाईन नोंदणी रात्री उशिरा करावी लागत असल्याने स्थानिक नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो. परिणामी बांदा येथील स्थानिक नागरिक नोंदणी झाली नसल्याने त्यांना लस घेता येता नाही. बांद्यासाठी लस उपलब्ध होत असूनही इतर ठिकाणचे लोक लस घेत असल्याने याबाबत स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती जिह्यातील सर्वच ग्रामीण भागात आहे. त्यामुळे हे लसीकरण ऑफलाईन करावे. त्यामुळे सर्वांना वेळेत लस मिळणे सोपे जाणार आहे. याबाबतचे निवेदन खान यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांना दिले आहेत.

Related Stories

पंधरा कोटी अपेक्षित, मिळाले फक्त दीड कोटी

NIKHIL_N

वाढती महागाई व गॅस दरवाढी विरोधात कुडाळात ठाकरे गटाचे पदाधिकारी रस्त्यावर !

Anuja Kudatarkar

राज्य निवडणूक कार्यालयाकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा

Abhijeet Khandekar

कोरोनाला चकवा देत इटली, भारत …पुन्हा कॅनडा

Patil_p

कोरोना समिती सदस्यांना विश्वासात न घेता सचिवांची मनमानी- ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर यांचा आरोप

Anuja Kudatarkar

सावंतवाडी भंडारी मंडळातर्फे जानेवारीत क्रिकेट स्पर्धा

Anuja Kudatarkar