Tarun Bharat

लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, आणि मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या राज्यांमध्ये आचारसंहिताही लागू झाली आहे. त्यामुळे या राज्यांमधील कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविण्यात येणार आहे. कोविन या प्लॅटफॉर्मवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आवश्यक ते फिल्टर लावणार असल्याचे अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने शनिवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या सात टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले. तसेच मतमोजणी 10 मार्च रोजी होणार आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचा फोटो हटवण्यासाठी आरोग्य मंत्रलायानुसार कोविन प्लॅटफॉर्मवर आवश्यक ते फिल्टर लावण्यात येणार आहे. मार्च 2021 मध्ये काही राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पदुच्चेरी निवडणुकांदरम्यान हे पाऊल उचलले होते.

दरम्यान, मागील वषी डिसेंबरमध्ये केरळ हायकोर्टाने लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचे छायाचित्र काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती.

Related Stories

पोलीस दलाचे होणार आधुनिकीकरण

Patil_p

बोधगयामध्ये चिनी महिलेला अटक

Amit Kulkarni

पुण्यात MPSC परीक्षेत गैरप्रकार, उमेदवाराकडून मोबाईल आणि ब्लूटूथ जप्त

datta jadhav

भारत-चीन तणावावर आज कोअर कमांडर स्तरावरील सातवी बैठक

datta jadhav

जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला केल्याप्रकरणी एकास सात वर्षांचा तुरुंगवास

Anuja Kudatarkar

एक दिवस हिजाब घातलेली पंतप्रधान होणार

Patil_p