Tarun Bharat

लसीकरण मंदावले; हेलपाटे मारून नागरिक कंटाळले

अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 28 जुलै 2021, सकाळी 10.00

● कराड, साताऱ्यासह अनेक केंद्रांवर रांगाच रांगा ● विना लसीकरण, विनामास्क सार्वजनिक ठिकाणे गजबजली ● जिल्हय़ात 24 तासात 701 पॉझिटिव्ह ● पॉझिटिव्हीटी रेट 7.92 वर ● पुन्हा अतिवृष्टीच्या इशारा झोप उडवणारा  

सातारा / प्रतिनिधी : 

जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यावर सार्वजनिक ठिकाणी गर्दीचा महापूर आला असून कराड, सातारासह इतर शहरातील बाजारपेठा अपवाद वगळता विनामास्क, विना सोशल डिस्टन्सिंग गजबजल्या आहेत. या परिस्थितीत जिल्ह्यात लसीकरणाचा वेग कमालीचा मंदावला आहे. नागरिकांना पहिला डोस मिळेना आणि दुसरया डोससाठीही हेलपाटे मारावे लागत आहेत. यातच रूग्णवाढीचा आकडा पुुन्हा हळूहळू वाढत आहे. दरम्यान गेल्या 24 तासात 701 रूग्णांची वाढ झाली असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.91 वर आहे. 

सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढल्याने लसीकरण गरजेचे

जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढली आहे. सातारा, कराड, वाई,,फलटण, कोरेगांवसह इतर शहरातील बाजारपेठांमधील गर्दी वेगाने वाढत आहे. या गर्दीत अनेकांकडून नियमांचे पालन होत नाही. वाढती गर्दी पाहता जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणाचे नियोजन गरजेचे आहे. मात्र जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामिण भागात लसीकरणासाठी नागरिक, ग्रामस्थांना ताटकळावे लागत आहे. 

दोन दिवसात मृत्यूदर पुन्हा वाढला

जिल्ह्यात कोरोना उपचार घेत असलेल्या 26 रूग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. 20 पेक्षा कमी झालेला मृत्यूदर पुन्हा वाढला आहे. कराडला 7, फलटणला 7, सातारा 5, वाई, पाटण येथे प्रत्येकी 2 रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यूचा वाढता आकडा रोखण्याचे आव्हान पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेपुढे आहे. जिल्ह्यातील खटाव, माण, कोरेगांव, महाबळेश्वर तालुक्यात त्या तुलनेत परिस्थिती सुधारत आहे. मात्र परिस्थिती सुधारली म्हणून गाफिलपणा वाढू न देण्याची आवश्यकता आहे. 

मंगळवारपर्यंत जिल्हय़ात  एकूण तपासणी 13,65,517, एकूण बाधित 2,15,932, एकूण कोरोनामुक्त 2,02,538, एकूण मृत्यू 5,183, एकूण उपचारार्थ 10,880

मंगळवारी जिल्हय़ात बाधित 701, मुक्त 813, बळी 26  

Related Stories

साताऱ्यात घुमला ‘मोदी हटाव’चा नारा

datta jadhav

‘खिदमत ए खल्क’मार्फत शाहुनगरीकरांच्या सेवेत 20 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर

datta jadhav

रूग्णालयातील कोविड वॉर्डही रिकामे

datta jadhav

यमाईदेवीचा रथोत्सव होणार साधेपणाने

datta jadhav

सातारा : उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आज मांडणार 307 कोटींच बजेट

Archana Banage

कोविड स्थिती नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल

datta jadhav