Tarun Bharat

लसीकरण हे राष्ट्रीय कर्तव्य : डॉ. अविनाश भोंडवे

ऑनलाईन टीम / पुणे :

आपल्याकडे लसीकरण हे एकच हत्यार आहे, ज्या द्वारे आपण कोरोनाला नियंत्रणात आणू शकतो. आज देशामध्ये कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण तिसऱ्या लाटेचा धोका संभवतो आहे. त्यामुळे प्रत्येकाचे लसीकरण व्हायला हवे. लसीकरण हे मानवतेच्याच दृष्टीने नाही तर राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे प्रतिपादन इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.

आनंदवन बहुउद्देशीय संस्था, भाजप एनजीओ आघाडी, पुणे शहर आणि द कॉन्सप्शन ग्रुप यांच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन शिवाजीनगर मधील शिरोळे रस्ता येथे करण्यात आले आहे. या लसीकरण शिबिराचे उद्घाटन डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक सुशील मेंगडे, गणेश कळमकर, दत्ता खाडे, आनंदवन बहुउद्देशीय संस्थचे डॉ. अजय दुधाणे ,दत्तात्रय सोनार, गणेश भोसले, प्रकाश पवार, विवेक राजगुरू, विनोद चव्हाण, धनंजय मराठे ,गणेश इरला, अविनाश पवार, निखिल कदम,सागर पांचाळ,योगेश मोरे,संदीप चव्हाण, अनिल ववले,संदीप सांवत ,ऋतिक पवार,शाम खेंगरे ,रुपेश पवार उपस्थित होते.

डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, भारतातील सर्व लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर ठेऊन नागरिकांनी लसीकरण करुण घ्यायला हवे. गरोदर आणि स्तनदा मातांनी देखील लसीकरण करुन घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ.अजय दुधाणे म्हणाले, आनंदवन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जास्तीत जास्त पुणेकरांचे लसीकरण होईल या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. संस्थेच्या वतीने एमएमसीसी महाविद्यालयात देखील लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. लसीकरण मोहीमेसाठी काम करणाऱ्या सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे देखील त्यांनी यावेळी आभार मानले.

Related Stories

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असे गणेश मंडळांचे कार्य

Tousif Mujawar

पुणे विभागातील 3 लाख 2 हजार 758 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar

राज्य सरकारमध्ये विसंवाद नाही- बाळासाहेब थोरात

Archana Banage

मनसे अॅक्शन मोडवर;’6 एम’वर लक्ष केंद्रीत करा, राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना सूचना

Archana Banage

“हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम”

Archana Banage

‘प्रत्येकाला त्यांचा देव निवडण्याचा अधिकार’; सर्वोच्च न्यायालयाने ‘परमात्मा’ फेटाळली याचिका

Abhijeet Khandekar