Tarun Bharat

लसीच्या भीतीने ग्रामस्थांची ‘शरयू’त उडी

Advertisements

वृत्तसंस्था/ बाराबंकी

उत्तरप्रदेशच्या बाराबंकी जिल्हय़ात कोरोनाच्या लसीवरून लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. लसीकरणाचे पथक पाहून घाबरलेल्या ग्रामस्थांनी शरयू नदीत उडी घेतल्याचा प्रकार घडला आहे. रामनगर तालुक्यातील सिसौंडा गावात ही घटना घडली आहे. तेथे शनिवारी आरोग्य विभागाचे पथक लसीकरणासाठी पोहोचले होते. लसीच्या भीतीने ग्रामस्थांनी गाव रिकामे करत कुटुंबासह शरयू नदीच्या काठावर धाव घेतली. आरोग्य विभागाचे पथक नदीकाठावर पोहोचताच  महिला आणि पुरुषांनी नदीत उडी घेत कित्येक तास नदीपात्रात बसून राहिले.

लसीकरणावरून ग्रामस्थांनी नदीत उडी घेतल्याचे समजताच प्रशासनात खळबळ उडाली. रामनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव शुक्ला यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांची समजूत काढली आहेत. बराचवेळ मनधरणी केल्यावर केवळ 14 ग्रामस्थांनी नदीतून बाहेर येत कोरोनावरील लस घेतली आहे.

कोरोनाची चाचणी आणि लसीमुळे आम्ही घाबरत होतो. अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांनी समजाविल्यावर आम्ही लस घेण्याची तयारी दर्शविल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. तर कोरोनावरील लसीमुळे ग्रामस्थ घाबरले होते. समजूत काढल्यावर 14 जणांनी लस घेतली आहे. उर्वरित लोकांनाही जागरुक केले जात असल्याचे शुक्ला यांनी सांगितले आहे.

Related Stories

कारगिल विजय दिन साधेपणाने साजरा

Patil_p

आपल्या कलाकृतीतून ‘कोरोनाला फटकावण्याचा संदेश’ देत सचिनच्या चाहत्याने दिल्या सचिनला शुभेच्छा!

prashant_c

शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका- संजय राऊत

Abhijeet Shinde

पत्रकार रोहित सरदाना यांचे हार्ट ऍटॅकने निधन

Patil_p

आरोग्यमंत्र्यांचा यू-टर्न; मोफत लसीबाबत म्हणाले…

datta jadhav

कोरोना संसर्गावरील उपचार होणार 40 टक्क्यांनी स्वस्त

Patil_p
error: Content is protected !!