कोविड-19 ची लस आल्यावर महामारी पूर्णपणे संपणार असल्याचे बायोएनटेक या जर्मन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी उगूर सेहिन यांनी म्हटले आहे. या महामारीने पूर्ण जगाला ओलीस ठेवले असून लस आल्यावर जग मुक्त होईल अशी अपेक्षा आहे. क्लीनिकल ट्रायल्स सुरू असून अत्यंत लवकर आणि अत्यंत उत्तम निष्कर्ष समोर येतील अशी अपेक्षा आहे. बायोएनटेक आणि फायजर अत्यंत वेगाने पुढे जात आहेत. लक्षणे दिसून येणाऱया कोरोनाबाधितांमध्ये ही लस अत्यंत प्रभावी ठरणार असल्याचे सेहिन म्हणाले.


previous post