Tarun Bharat

लसीवर अवलंबून राहू नका, कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यावर भर द्या : WHO

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. रशिया, चीनसह काही देशांनी कोरोनावर लस शोधल्याचा दावाही केला आहे. असे असले तरी कोरोनावरील लसीवर अवलंबून न राहता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर भर द्या, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

कोरोनावरील लस तयार झाली तरी मागणी जास्त असल्याने पुरवठा होणार नाही. सर्व देशांना कोरोनापासून संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणताही देश सुरक्षित राहणार नाही. त्यामुळे कोणत्याही देशाने कोरोनावरील लसीवर अवलंबून न राहता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर भर द्यावा, असे डब्ल्यूएचओचे पश्‍चिम प्रांत विभागाचे संचालक डॉ. ताकेशी कसाय यांनी म्हटले आहे.

अनेक देशांनी कोरोना साथीच्या नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या काळात सुरक्षित सार्वजनिक आरोग्याच्या दिशेने त्या-त्या देशांच्या सरकारने प्रयत्न केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Related Stories

युक्रेनच्या स्थलांतरितांना जिल बायडेन भेटणार

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 25 लाखाचा टप्पा

datta jadhav

ऑस्ट्रिया : सीमा खुली

Patil_p

मोदी सत्तेत आल्यापासून देशातील स्वातंत्र्य कमी झाले : ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल

Tousif Mujawar

मॉडर्ना लसीला मंजुरीची ट्रम्प यांची घोषणा

Patil_p

एका चुकीमुळे गमावले 17 लाख फॉलोअर्स

Patil_p