Tarun Bharat

लस ठरतेय बुस्टर

Advertisements

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम उपाय मानला जात आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत अधिकाधिक लसीकरण होणे गरजेचे आहे.

  • यादरम्यान उपचारात अँटीबॉडी विकसित झाल्याने बरे झालेल्या रुग्णांनी किमान दोन-अडीच महिने लस घेण्याची गरज नाही, असे म्हटले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी तर सहा महिन्यांपर्यंत लस घेण्याची आवश्यकता नाही, असेही सांगण्यात आले.
  • पण बरे झालेल्या रुग्णाच्या शरिरात जवळपास वर्षभर अँटीबॉडी राहत असल्याचे एका संशोधनातून निष्पन्न झाले आहे.
  • अशा वेळी या रुग्णांनी लस घेतली तर ही अँटीबॉडीत आणखी वाढ होते. म्हणजेच कोरोना प्रतिबंधक लस ही बुस्टरप्रमाणे काम करत आहे.
  • अँटीबॉडी असतानाही लस महत्त्वाची
  • आंतरराष्ट्रीय जर्नल नेचरमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार जर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली तर त्यांच्या शरिरात संसर्गाचा सामना करण्यासाठी आणखी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती विकसित होते. म्हणजेच अँटीबॉडी असतानाही लस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दुसर्यांदा कोरोनाची बाधा होण्याची शक्यता कमी राहते.
  • अँटीबॉडी आयुष्यभर शरिरात राहते
  • वॉशिंग्टन यूनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधक म्हणतात, की अँटीबॉडी आयुष्यभर शरिरात राहतात. त्यांच्या मते, सौम्य कोरोनाचा सामना करुन बरे झालेल्या रुग्णांत इम्यून पेशी राहतात. या पेशी शरिरातील अँटीबॉडीला सांभाळण्याचे काम करतात.
  • नेचर’च्या रिपोर्टमध्ये म्हटले की, काळानुरुप शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परंतु अँटीबॉडी तयार करणार्या बी-पेशीची क्षमता कमी होत नाही.
  • याचे आकलन करण्यासाठी संसर्गानंतर 1.3 आणि 6.2 महिन्यांच्या कालावधी उलटल्यानंतर 87 जणांवर अभ्यास करण्यात आला. यात त्यांच्या शरिरातील अँटीबॉडी कमी झाल्याचे लक्षात आले. परंतु सहा महिन्यानंतरही रोगप्रतिकारक शक्ती तयार करणार्या बी-पेशीच्या संख्येत आणि गुणवत्तेत घट झालेली नसल्याचे निदर्शनास आले.
  • बी-पेशी 6.2 महिन्यानंतर सक्रिय होऊन एक मजबूत अँटीबॉडी तयार करण्याचे काम केले. बी-पेशी या अँटीबॉडीची गुणवत्ता कायम ठेवण्याचे काम करतात.

Related Stories

धोका फुप्फुसच्या कर्करोगाचा

Omkar B

सर्प दंश होताच घाबरू नका, अशी घ्या काळजी

Abhijeet Khandekar

एमएमआर लसः नवा दिलासा ?

Omkar B

मातंगी मुद्रा

tarunbharat

प्लाज्मा थेरपीचे वरदान

Omkar B

हनुमानासन

Omkar B
error: Content is protected !!