Tarun Bharat

लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देणे चुकीचे

Advertisements

लस न घेतलेल्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश नाकारला

बेंगळूर/प्रतिनिधी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना लसीकरणाचीही संख्या वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान संधी असूनही वैद्यकीय विद्यार्थी आणि अग्रभागी कामगार यांना कोरोनाची लस दिली गेली नाही त्यांना आता वेगळी समस्या भेडसावत आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास होत आहे. अनेक वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, महाविद्यालयीन व्यवस्थापन ऑफलाइन वर्गात जाण्यापूर्वी कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रांची मागणी करीत असल्याचे म्हंटले आहे. प्रमाणपत्र असेल तरच वर्गात प्रवेश दिला जात आहे. अन्यथा अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तथापि, ही लस सक्तीची नाही म्हणून महाविद्यालयांची मागणी ही नियमांच्या विरूद्ध आहे.

दरम्यान दंत महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले की, लस न मिळाल्यामुळे कॉलेजने वर्गात प्रवेश दिला नाही. मुलांना लसीकरण मिळावे म्हणून त्यांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे दाखल्याची मागणी केली पण व्यवस्थापनाने देण्यास नकार दिला.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना लस देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ९८ टक्के विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांना लस देण्यात आली आहे. लसीकरण होईपर्यंत पीडित विद्यार्थी ऑनलाईन वर्गात प्रवेश घेऊ शकतात, असे म्हंटले आहे.

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. सच्चिदानंद यांनी, सरकारने ही लस बंधनकारक केली नाही. अशा परिस्थितीत महाविद्यालयीन व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना रोखणे चुकीचे असल्याचे म्हंटले आहे.

Related Stories

कर्नाटक पीयूसी द्वितीय वर्षाच्या पुरवणी परीक्षा ७ सप्टेंबरपासून

Abhijeet Shinde

कर्नाटक : कोडगू जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच

Abhijeet Shinde

उपमुख्यमंत्री कोविंद कारजोळ कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

देशात बेंगळूर जिल्हा लसीकरणात अव्वल

Abhijeet Shinde

सीईटी 28, 29 ऑगस्ट रोजी

Patil_p

Weather update: कर्नाटकात १३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज

Abhijeet Shinde
error: Content is protected !!