Tarun Bharat

लस बाजारात आणणार चीन

चीनची लसनिर्माता कंपनी चायना नॅशनल बायोटेक ग्रूपने देशाच्या आरोग्य नियामकांकडून लस बाजारात सादर करण्याची अनुमती मागितली आहे. या अर्जात कंपनीच्या मध्यपूर्व आणि दक्षिण अमेरिकन देशांमध्ये करण्यात आलेल्या तिसऱया टप्प्यातील मानवी परीक्षणाचे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. तसेही कंपनीने हे निष्कर्ष सार्वजनिक केलेले नाहीत. चीनमध्ये तीन महिन्यांपूर्वीच लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे.

फायजरकडून नोंदणी प्रक्रिया

अमेरिकेच्या फायजर इंक या कंपनीने अमेरिकेनंतर आता ब्राझीलमध्येही स्वतःच्या लसीची नोंदणी करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे. ब्राझीलच्या आरोग्य नियामकांसमोर कंपनीने स्वतःच्या लसीला मंजुरी देण्यासाठी अर्ज केला आहे. ब्राझीलमध्ये लस उपलब्ध करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे कंपनीने म्हटले आहे. फायजरने जर्मनीच्या बायोएनटेक या कंपनीसोबत मिळून बीएनटी162बी2 लस तयार केली आहे.

Related Stories

श्रीलंकेतील आणीबाणी पाच दिवसांनंतर उठवली

Patil_p

नेल-पॉलिश लावल्यास बोटं कापू

Patil_p

अमेरिकेने दहशतवादी संघटनांच्या नाड्या आवळल्या

datta jadhav

हैतीमध्ये भूकंप ; आतापर्यंत १,२९७ लोकांचा मृत्यू तर अनेक शहरं उद्ध्वस्त

Archana Banage

अमेरिकन महिलेची भारतीयांवर शेरेबाजी

Patil_p

हिमखंड कोसळून 6 जणांचा मृत्यू

Patil_p