Tarun Bharat

‘लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा’

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर असा वाद रंगला असतानाच याच प्रकरणावरून आता काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. देश कोरोनाशी झुंजत असताना आणि लसींचा तुटवडा असताना केंद्र सरकार मात्र ट्विटरच्या मागे लागले असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडत असल्यामुळे कोविडची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा’, असे सूचक आणि खोचक ट्वीट राहुल गांधींनी केले आहे.

देशात सध्या लसींच्या तुटवडय़ाची समस्या उभी राहिली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत ऑक्सिजन तुटवडय़ाची समस्या होती. त्याशिवाय रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड या समस्यादेखील समोर येत आहेत. यावर राहुल गांधी यांनी वेळोवेळी निशाणा साधल्यानंतर आता त्यांनी ‘ट्विटर’ वादावरून सरकारवर टीकास्त्र सोडले.

केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियावरील सेवा देणाऱया सर्व कंपन्यांसाठी नवी नियमावली जारी केली. या नियमावलीनुसार सोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश पहिल्यांदा पोस्ट करणाऱयाची माहिती देणे, भारतात नोडल अधिकारी, तक्रार निवारण अधिकारी यांची नेमणूक करणे अशा अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. 26 मे पासून देशभरात ही नियमावली लागू झाली असून ट्विटरकडून अजूनही त्यावर कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे नुकताच सरकारने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Related Stories

देशात डिजिटल बँकिंग केंद्रे सुरू

Amit Kulkarni

अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

Patil_p

रेल्वे प्रवाशांना उचलावे लागणार नाही सामान

Patil_p

आर्यनची 26 दिवसांनी मन्नत पूर्ण

Patil_p

जालंधरच्या विद्यापीठात विद्यार्थ्याची आत्महत्या

Patil_p

म्यानमारचे 30 हजार शरणार्थी मिझोरममध्ये

Patil_p