Tarun Bharat

लहान मुलांतील एच.आय.व्ही. संसर्ग रोखण्यास यश – जिल्हाधिकारी

प्रतिनिधी / सांगली

एच.आय.व्ही. संसर्गीत मातेपासून जन्मलेल्या मुलांची एचआयव्ही तपासणी केली जाते. सांगली जिल्ह्यामध्ये एप्रिल ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 22 मुलांची 6 व्या आठवड्यात DNA-PCR तपासण्या करण्यात आल्या. यात 21 मुलांच्या 18 व्या महिन्यात अँटीबॉडी टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये सर्व मुले एच.आय.व्ही. निगेटीव्ह आढळून आली. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मोठी समाधानकारक बातमी आहे. यामध्ये सातत्य राखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र व सर्व शासकीय व खाजगी रूग्णालयात गर्भवती मातांची एच.आय.व्ही. तपासणी पहिल्या तिमाहीत करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या.

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त व्ही.व्ही. पाटील यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. विवेक सावंत यांनी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती देवून आढावा सादर केला.

Related Stories

सोनी येथे सापडला शेतकऱ्याचा संशयास्पद मृतदेह

Archana Banage

सांगली : सोन्याळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना डॉक्टरविना पोरका!

Archana Banage

मध्य रेल्वे महाप्रबंधकांकडून रेल्वे दुहेरीकरणाची पाहणी

Archana Banage

मिरजेत घर कोसळून दोन महिला ढिगाऱ्याखाली

Archana Banage

सांगली : गल्लीबोळात आग विझविण्यासाठी धावणार आता ‘आयुष फायर बाईक’

Archana Banage

सांगली : गणेशोत्सवाच्या खर्चातून केली रस्त्याची स्वच्छता

Archana Banage