Tarun Bharat

लहान मुलांना लस कधी ? अदर पूनावालांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने १७ सप्टेंबर रोजी देशात अडीच कोटी कोरोना लसीचे डोस दिले असल्याने भाजपच्या वर्तूळात आनंदाचे वातावरण आहे. तर दररोज इतके कोरोना लसीचे डोस मिळतील का असा खोचक सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे. यामुळे कोरोना लसीबद्दलची चर्चा देशभर सुरु आहे. मात्र १८ वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुला-मुलींची कोरोना लसीची प्रतीक्षा आज पर्यंत संपलेली नाही. यासंदर्भात सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

सीईओ अदर पूनावाला यांनी १८ च्या खालच्या वयोगटातील मुला-मुलींसाठी कोरोना लसीची घोषणा केली असून लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लस चाचण्या सुरळीतपणे सुरू आहेत. या सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडल्यास पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल”, असं अदर पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला ३ ते ४ महिने लागतील अस ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

“लखीमपूर हत्याकांड हा मंत्रिपुत्राचा पूर्वनियोजित कटच”

Archana Banage

पुलवामात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

राजस्थानच्या मंत्र्याचा पुत्र फरार

Patil_p

काश्मीरमध्ये स्थानबद्धतेवरून राजकारण

Patil_p

शिक्षणमंत्र्यांचा ईमेल आयडी हॅक

Patil_p

माकड होण्याचे प्रशिक्षण घेत आहेत लोक

Patil_p