Tarun Bharat

लाँकडाऊन काळात बेळगावमार्गे गोव्यात एकुऊ 680 वाहनांंतून भाज्यांची वाहतूक.

सद्या मुबलकप्रमाणात भाजी ऊपलब्ध.

वाळपई / प्रतिनिधी

 कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर गोव्यामध्ये पूर्णपणे लाँकडाऊन करण्यात आल्यानंतर कर्नाटकातील बेळगाव भागातून  केरी मार्गे व महाराष्ट्र राज्यातून पर्येमार्गे आतापर्यंत भाजीच्या 680 वाहनाच्या माध्यमातून गोवेकरासाठी भाजीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यात बेळगाव मार्गे केरी तपासणी केंद्रावरून या सर्व भाजीच्या गाडय़ा आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 21 मार्च ते आतापर्यंत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भाजीच्या गाडय़ा उपलब्ध झाल्यामुळे गोव्यातील भाजी टंचाईचा प्रश्न दूर झालेला आहे .आजही मोठय़ा प्रमाणात भाजीच्या गाडय़ा बेळगाव मार्गे गोव्यात येत असून यामुळे भाजीच्या तुटवडय़ाची कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नसल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

 याबाबतची माहिती अशी की कोरोना रोगाच्या जागतिक पातळीवर निर्माण झालेली गंभीर परिस्थिती यामुळे देशात मोठय़ा प्रमाणात हाहाकार माजलेला आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गोवा सरकारने परराज्यातून येणारी सर्व नाकी सीलबंद करण्यात आलेली असून फक्त जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना गोव्यामध्ये प्रवेश दिला जात नाही. गोवेकरासाठी मोठय़ा प्रमाणात बेळगावची भाजी बाजारपेठ प्रमुख समजली जात असून भाजी तांदूळ दूध अशा जीवनावश्यक वस्तूंना गोव्यामध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे आतापर्यंत 21 मार्च ते आजपर्यंत गोव्यामध्ये एकूण 680 वाहनांच्या माध्यमातून गोव्यातील भाजीचा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा सरकारने प्रयत्न केलेले आहेत .यामुळे आजही मोठय़ा प्रमाणात गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात भाजी उपलब्ध असून यामुळे येणाऱया काळात  कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. आजपासून गोव्यामध्ये भाजी उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून वाहनांवर बंदी घालण्यात आल्याचे अफवा पसरल्यानंतर या संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानंतर या संदर्भातील आकडेवारी उपलब्ध झाली व कोणत्याही प्रकारची वाहने खासकरून जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करणाऱया वाहनावर कोणत्या प्रकारचे निर्बंध अजून पर्यंत न घातल्याचे सुत्राकडून उपलब्ध झालेली आहे.

 यासंदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोव्यातील  लाँकडाऊन कार्यकाळात जीवनावश्यक वस्तू घेऊन बेळगावमार्गे त्याचप्रमाणे  महाराष्ट्रातील  तळेखोल पर्ये भागातून मोठय़ा प्रमाणात वाहने गोव्यामध्ये दाखल झालेली आहे. यात केरी तपासणी केंद्रावरून भाजी घेऊन येणाऱया वाहनांची संख्या 680 असून दूध वाहने 106 तांदूळ 59 वाहने गॅस सिलेंडर वाहतूक एक वाहन फळे 136 वाहने व इतर स्वरूपाची वाहने 209 त्याचप्रमाणे महाराष्ट्र भागातून आतापर्यंत जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱया वाहनांच्या संख्येपैकी दूध वाहने आठ गॅस सिलेंडर वाहने दोन फळ वाहने एक व इतर स्वरूपाची एकूण दहा वाहनांचा समावेश आहे.

दरम्यान एकूण बेळगावमार्गे वेगवेगळय़ा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तु घेऊन येणाऱया वाहनांची संख्या एकूण 1194 तर महाराष्ट्रातील भागातून येणाऱया वाहनांची संख्या 27 एवढी आहे.

 सध्यातरी गोव्यामध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी मोठय़ा प्रमाणात भाजी उपलब्ध असून कोणत्या प्रकारची वाहने बंद झालेले नाहीत .यामुळे गोवेकरांनी अजिबात चिंता करण्याची गरज नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वांयगणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 21 मार्च ते आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात गोव्यामध्ये भाज्याची वाहतूक झालेली आहे .त्याचप्रमाणे समाधानरित्या दुधाचा पुरवठा वाहनांच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यामुळे गोव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुटवडा भरलेला नाही. सध्याही मोठय़ा प्रमाणात भाजी व दुधाची वाहने गोव्यामध्ये येत असल्याचे निरीक्षक शिवराम वायगणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

अंमलबजावणी पथकाची धारबांदोडय़ात कारवाई

Amit Kulkarni

शंभू भाऊ बांदेकर यांच्या ‘अंतर्नाद’ पुस्तकाचे प्रकाशन

Patil_p

ग्लेनमार्क कामगारांच्या सिक्किम, नाशिक येथे बदल्या रद्द

Patil_p

पोलीस खात्यात वरिष्ठांकडून स्वार्थी डावपेच

Amit Kulkarni

राज्यातील सर्व खेडी पादंक्रत करण्याचा राज्यपालांचा मनोदय

Amit Kulkarni

कत्तल करण्यायोग्य गुरे कर्नाटकातून आणावीत : खा. सार्दिन

Omkar B