Tarun Bharat

लाँचिंगच्या चार महिन्यानंतर 100 ओला ई स्कूटरची डिलिव्हरी

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ओला कंपनीने ग्राहकांना प्रतिक्षेत ठेवलेल्या लाँचिंगनंतरच्या स्कूटरची अखेर डिलिव्हरी करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर एस 1 ची डिलिव्हरी सुरू केली आहे. कंपनीकडून बेंगळूर आणि चेन्नईतील 100 ग्राहकांना स्कूटरची डिलिव्हरी दिली आहे. याच्यासाठी बेंगळूर येथील मुख्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाविश अग्रवाल उपस्थित होते. सदरची ई-स्कूटर ही 15 ऑगस्ट रोजी सादर करण्यात आली होती.

ओलाने सादरीकरणावेळी पर्चेजिंग विंडो सुरू केली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हीच विंडो पुन्हा सुरू केली होती. यासह 10 नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांमध्ये टेस्ट राइड सुरू केले होते. कंपनी आगामी विंडो ही जानेवारी रोजी ओपन करणार असून ई स्कूटरचे बुकिंग 499 रुपयात करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यात एस 1 मॉडेलची किंमत 99,999 रुपये  आणि एस 1 प्रो ची किंमत 1, 29,999 रुपये असणार आहे.

Related Stories

टाटा टीयागो ईव्हीच्या बुकिंगला दमदार प्रतिसाद

Patil_p

मागील वर्षाच्या तुलनेत दुचाकी वाहनांची विक्री घटली

Amit Kulkarni

टीव्हीएस मोटरला 319 कोटीचा नफा

Amit Kulkarni

‘फास्टॅग’ जाणार, ‘हे’ येणार..!

Nilkanth Sonar

महिंद्रातर्फे न्यू बोलेरो मॅक्स पिक-अप सादर

Patil_p

भारतात एएमजी कार्सचे उत्पादन सुरु

Patil_p
error: Content is protected !!