Tarun Bharat

लांजात अनधिकृत टपऱया, शेड हटवल्या

प्रतिनिधी/ लांजा

लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गालगत प्रशासनामार्फत भूसंपादन केलेल्या जागेवर अतिक्रमण केलेल्या अनधिकृत टपऱया, पत्र्याच्या शेड यांच्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने बुधवारपासून  पोलीस बंदोबस्तात  कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दोन दिवसात ही अतिक्रमणे स्वतहून न हटविल्यास सर्व अनधिकृत बांधकामे महामार्ग विभागाच्यावतीने कारवाई तीव्र करणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र लांजा शहरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी प्रशासनाने भूसंपादन केलेल्या जागेवर बिनदिक्कतपणे अनधिकृतरित्या टपऱया, दुकाने, पत्र्याच्या शेड आदी बांधकामे उभी राहिली आहेत. अगदी रेस्ट हाऊसपासून ते कोर्लेफाटा पर्यंतच्या परिसरात रातोरात अशी अनेक बांधकामे रातोरात उभी राहिली आहेत. 

सर्व अनधिकृत बांधकामे, टप्रया 15 डिसेंबर पर्यंत हटवा अशा सूचना राष्ट्रीय महामार्ग विभागाने संबंधित व्यावसायिकांना या अगोदर दिल्या होत्या. मात्र तरीही या छोटय़ा छोटय़ा विक्रेते, टपरी चालक यांनी त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत  व्यवसाय सुरू ठेवले होते.

या पार्श्वभूमीवर आज बुधवारपासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने लांजा शहरातील या सर्व अनधिकृत टप्रया, दुकाने हटाव मोहीम पोलीस बंदोबस्तात हाती घेण्यात आली. दरम्यान, अनधिकृत टपऱया, शेड उभ्या करणाऱयांनी स्वतहून हटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार गुरूवारी ही कारवाई थांबविण्यात आली. या आवाहनानुसार स्वतहून अतिक्रमणे न हटवल्यास पुढील दोन दिवसात ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

Related Stories

टाळेबंदी काळात जिह्यात गर्भपात वाढले

Patil_p

निडलवाडी पडली वेशीबाहेर !

Anuja Kudatarkar

अनुकूल हवामानामुळे मच्छीमारांच्या जाळ्य़ात मासळी!

Patil_p

‘आरोग्य सेतू’ ऍप डाऊनलोड करा!

NIKHIL_N

जिल्हय़ाला पावसाने झोडपले

NIKHIL_N

कराड नगरपालिकेतर्फे विविध स्पर्धा

Patil_p