Tarun Bharat

लांजात छुप्या पद्धतीने गावठी दारुधंद्याना ऊत

-माहिती देऊनही पोलीस दखल घेतात तात्पुरती

प्रतिनिधी/ लांजा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशी दारुधंद्यावर शासनाने बंदी घातली असतानाही तालुक्यातील कोंडगे गावात छुप्या पद्धतीने गावठी दारुधंद्याना ऊत आला आहे. ग्रामस्थानी लांजा पोलिसात तीनवेळा तक्रारी करून परिसरातील छुप्या दारुधंद्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्यापही कारवाई करण्यात आली नसून दारुधंदे सुरूच आहेत. सरपंच व महिलांनी अनेकवेळा पोलिसांना माहिती दिली होती. दारुसाठाही पकडून दिला होता. मात्र पुन्हा गावठी दारु सुरू झाल्याने गाव परिसरात संताप व्यक्त होत आहे.

 सध्या कोरोनाच्या महामारीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या गंभीर परिस्थितीत दारुधंद्यांवर शासनाने पूर्णतः बंदी घातली गेली आहे. मात्र असे असतानाही लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये छुप्या पद्धतीने सकाळ व सायंकाळच्या सुमारास दारुविक्री सुरू आहे. शासनाने देशी दारु दुकाने, बिअरशॉपी यांच्यावर बंदी घातल्याने ग्रामीण भागातील गावठी दारुधंद्यांना उत आला आहे. ग्रामीण भागातील बिटनुसार असणारे पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत. तालुक्यातील कोंडगे, कणगवली, साठवली आदी भागांमद्ये छुप्या पद्धतीने गावठी दारुविक्री होत असल्याने त्या-त्या गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  तालुक्यातील कोंडगे परिसरात छुप्या पद्धतीने सध्या गावठी दारुविक्री केली जात आहे. गेली 3 महिने दारुविक्री सुरू असून ग्रामस्थांनी या बाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोना विषाणुची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाही कोंडगे परिसरात गावठी दारु विक्रीकडे पोलिसांचे दुर्लक्ष का, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. कोंडगे गावामध्ये झर्ये, कुरंग यासह अन्य शेजारील गावातून नागरिक येत आहेत. त्यामुळे गावामध्ये दारुसाठी बाहेरुन येणाऱयांची गर्दी होत आहे. या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती देऊनही पोलीस दखल घेत नसल्याने ग्रामस्थ नाराजी दर्शवत आहेत. काही महिन्यापूर्वी गावच्या महिलांनी व सरपंच यांनी दारुसाठा उद्ध्वस्त केला होता. यासह गावात वाहनाने येणारी दारु पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्पुरती समज देण्याचे काम केल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

Related Stories

‘सिलिका’ दंडात्मक कारवाईनंतर पुढे काय?

NIKHIL_N

कोसुंब येथील रंजना जाधव सापडल्या तामिळनाडूत

Patil_p

जिह्यात चाचण्यांसह पुन्हा रुग्णसंख्येत घट

Patil_p

रत्नागिरी : आसुद डोंगराची भुगर्भ शास्त्रज्ञांनी केली पाहणी

Archana Banage

चाहूल थंडीची ? तळकोकणही हळूहळू गारठतय !

Anuja Kudatarkar

परप्रातीय ट्रॉलर्स रोखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे

Patil_p