Tarun Bharat

लांजात ‘सोशल डिस्टंन्सिग’चे उल्लंघन

Advertisements

प्रतिनिधी/ लांजा

शासनाने वाढीव मोफत धान्य पुरवठा करण्यास सुरूवात केल्याने रेशनिंग दुकानांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. लांजा शहरातील रेशन धान्य दुकानावर रविवारी सुमारे 400 च्या आसपास नागरिकांनी रेशनिंगसाठी गर्दी केली होती. यामुळे लांजात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवरील ‘सोशल डिस्टंन्सिग’चे उल्लंघन होताना दिसत आहे. गर्दी वाढत गेल्याने अखेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी रेशनिंग दुकानावर धाव घेऊन पोलिसांमार्फत गर्दी हटवली.

‘कोरोना’बाबत लांजा शहरामध्ये प्रशासन जनजागृती करत असतानाही नागरिक ‘सोशल डिस्टंन्सिग’ गंभीर घेताना दिसत नाहीत. शहरात सकाळ सत्रामध्ये नागरिकांची गर्दी सुरू असते. रविवारी शहरातील रेशन दुकानावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी 9 पासून लांजा शहरासह शेजारील गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र हळूहळू गर्दी वाढल्याने रेशन दुकानासमोरील पटांगणाला जत्रेचे स्वरुप आले होते.  रेशनिंग दुकानाचे कर्मचारी सांगूनही नागरिक मनमानीपणे गर्दी करत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक असताना नागरिक कोणतेच सुरक्षित अंतर ठेवत नव्हते. एकाच इमारतींमध्ये 3 रेशन दुकाने असल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नागरिकांची धान्य घेण्यासाठी झुंबड पहायला मिळाली. ‘सोशल डिस्टंन्सिग’ न पाळता रेशनिंग दुकानासमोर नागरिक विस्कळीतपणे उभे होते. नागरांची गर्दी वाढत गेल्याने अखेर पोलिसांना बोलावण्यात आले. मात्र तरीही गर्दी हटत नसल्याने अखेर लांजा तहसीलदार वनिता पाटील यांनी रेशनिंग दुकानाला भेट देत कर्मचाऱयांना सूचना देऊन नागरिकांच्या जमावाला ध्वनीक्षेपकाद्वारे कोरोनाबाबत काळजी व प्रत्येक व्यक्तीमधील अंतर ठेवण्याबाबतची माहिती दिली. प्रत्येकाला धान्य मिळणार असून सकाळ सत्रामध्ये 50 नागरिकांना तर उर्वरित 50 नागरिकांना सायंकाळी धान्य वाटप करण्यात येईल, असे सांगितले. यासह पोलीस निरीक्षक यांनी रेशनिंग दुकानासमोर नागरिकांचे सुरक्षित अंतर राहण्यासाठी चुनाच्या सहाय्याने चौकोन आखून देण्याच्या सूचना केल्या. त्यांनतर सुमारे 400 च्या आसपास जमलेली नागरिकांची गर्दी कमी झाली.

Related Stories

खेडमध्ये 16पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चषक क्रिकेट स्पर्धा

Patil_p

45 वर्षावरील नागरिकांचे पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण 5 जुलै रोजी

Anuja Kudatarkar

कोल्हापूरातील दारू कारवाईत सावंतवाडीतील एकास अटक

Anuja Kudatarkar

टू बी ऑर नॉट टू बी!

NIKHIL_N

अमेरिकन पुस्तकात कोकणातील तीन लोककथा

NIKHIL_N

भ्याड हल्ल्याचा वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

Anuja Kudatarkar
error: Content is protected !!