Tarun Bharat

लांजा-कोट येथे बिबटय़ा जेरबंद

प्रतिनिधी/ लांजा

रात्रीच्या सुमारास गोठय़ात शिरलेल्या बिबटय़ाला पिंजऱयात जेरबंद केल्याची घटना लांजा तालुक्यातील कोट गावच्या नारकरवाडी येथे घडली. रविवार 7 नोव्हेंबर रोजी पहाटे 5.30 च्या दरम्यान बिबटय़ाला पकडण्यासाठी वनाधिकारे यांनी रेस्क्यु ऑपरेशन करण्यात आले.   

 मिळालेल्या माहितीनुसार, कोट गावातील नारकरवाडीतील चंद्रकांत सोमा नारकर यांच्या घरापासून 10 ते 15 फुटांवर दगडी गोठा आहे. या गोठय़ाचा दरवाजा उघडा राहिल्यामुळे शनिवार रात्री दीडच्या दरम्यान बिबटय़ा गोठय़ात शिरला. आवाज आल्याने नारकर बाहेर पाहण्यासाठी गेले असताना एक बिबटय़ाबाहेर जाताना दिसला म्हणून गोठय़ात आत डोकावून पाहता एक बिबटय़ा गोठय़ात असल्याचे दिसले. लगेचच गोठय़ाचा दरवाजा बंद करण्यात आला. गोठय़ात जनावरे नसल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. 

 गावची नारकरवाडीतील चार ते पाच घरे गाव वस्तीपासून दूर आहेत. घाबरलेल्या नारकर यांनी याविषयीची माहिती गावचे पोलीस पाटील, ग्रामस्थ यांना दिली. पोलीस पाटील यांनी लांजाचे वनपाल दिलीप आरेकर यांना याची खबर दिली. आरेकर यांनी तत्काळ आपल्या फौजफाटय़ासह घटनास्थळी दाखल झाले. दरवाजाला पिंजरा लावून बिबटय़ाला पिंजऱयात जेबंद करण्यात वनाधिकारी यांना यश आले. बिबटय़ाला पकडण्यासाठी विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राचे वनाधिकारी प्रियांका दगड, वनपाल दिलीप आरेकर, सुरेश उपरे, गौतम कांबळे, वनरक्षक विक्रम कुभांर, सागर पताडे, न्हानू गावडे, मिलिंद डांबले, अतिश कीर,  अनिकेत मोरे, लांजा पोलीस, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पनवेलकर आदींनी रेस्क्यु ऑपरेशन केले.

Related Stories

चिपळूणच्या प्रथमेश राजेशिर्केचा ‘युपीएससी’त झेंडा!

Patil_p

कोरोनाबाधित महिलेकडून कर्मचाऱयांना धमकी

Patil_p

महाविकास आघाडीची विरोधकांकडून चुकीची प्रतिमा

Patil_p

मालवण तंत्रनिकेतनच्या २४ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीद्वारा निवड

Anuja Kudatarkar

परशुराम घाटात पुन्हा खोदाई सुरू

Archana Banage

22 रुपये किलोने पॅनिंगसाठी आंब्याची खरेदी

Patil_p