Tarun Bharat

लांब उडीत नयना जेम्सला जेतेपद

Advertisements

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

येथील कलिंगा स्टेडियमवर घेण्यात आलेल्या इंडियन ग्रां प्रि 4 ऍथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या लांब उडीमध्ये नयना जेम्सने ऍन्सी सोजनला मागे टाकत जेतेपद मिळविले.

चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत पहिल्या दोन फेऱयांत ऍन्सी सोजनने 6.29 मी.अंतर नोंदवत आघाडी घेतली तर चौथ्या फेरीत तिने 6.35 मी. लांब उडी घेतली. पण नयना जेम्सने 6.37 मी. लांब उडी घेत जेतेपद पटकावले. यू-20 विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत रौप्य मिळविणाऱया शैली सिंगला येथे तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. नयनाने पहिल्या उडीत फाऊल केले तर दुसऱया प्रयत्नात 5.99 मी. उडी घेतली. मात्र तिसऱया फेरीत 6.30 मी. अंतर नोंदवत ती शर्यतीत आली. तिने सोजनपेक्षा फक्त एक सेंटीमीटर अंतर जास्त नोंदवले होते. चौथ्या प्रयत्नात ऍन्सीने 6.35 मी. अंतर नोंदवल्यानंतर नयनाने 6.37 मी. अंतर दोनदा नोंदवत जेतेपद मिळविले. ऍन्सीने शेवटच्या प्रयत्नात फाऊल केले.

पुरुषांच्या 100 मी. शर्यतीत अमिया कुमार मलिक व आर्यन एक्का यांनी अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळविले. महाराष्ट्राच्या करण विवेक हेगिस्तेने कांस्यपदक मिळविले.

Related Stories

अमेरिकन टेनिस स्पर्धेत व्हीनसला वाईल्ड कार्ड

Amit Kulkarni

लोरेन्झो मुसेटी विजेता

Patil_p

सचिनचा पुन्हा मदतीचा हात

Patil_p

सेहवाग म्हणतो चार दिन की चाँदनी होती है, टेस्ट क्रिकेट नही!

Patil_p

रवींद्र जडेजा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : स्टीव्ह स्मिथ

Patil_p

विंडीजला 154 धावांची आघाडी, कॉर्नवलचे 5 बळी

Patil_p
error: Content is protected !!