Tarun Bharat

लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडय़ांना वाढता प्रतिसाद

प्रवाशांचा रेल्वेप्रवासाकडे वाढता ओढा

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनानंतर पूर्णपणे बंद असलेला रेल्वेचा प्रवास हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पॅसेंजर रेल्वे अद्याप सुरू नसल्यातरी लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडय़ांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येत आहे. रेल्वेचा तिकीट दर हा सर्वसामान्यांना परवडेल या दरात असल्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती ही रेल्वेप्रवासाला असते. यामुळेच लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.

हुबळी ते मिरज या दरम्यान बेळगाव हे सर्वांत महत्त्वाचे रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकावरून रेल्वेप्रवास करणाऱयांची संख्याही मोठी आहे. लॉकडाऊनपूर्वी देशातील महत्त्वाच्या शहरांना रेल्वेसेवा सुरू होती. मुंबई, दिल्ली, हैदाबाद, बेंगळूर, एर्नाकुलम, तिरुपती, अजमेर या शहरांना विमानसेवा सुरू होती. परंतु लॉकडाऊनपासून रेल्वेसेवा काही महिने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. मे महिन्याच्या अखेरीस रेल्वे सुरू करण्यात आली परंतु काही मोजक्मयाच रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. त्यावेळी रेल्वेप्रवासावर अनेक निर्बंधही लावण्यात आले होते. त्यामुळे रेल्वे प्रवास करणाऱयांची संख्या अत्यंत कमी होती. परंतु आता पुन्हा रेल्वे प्रवासाला गती मिळाली आहे. रेल्वे प्रवाशांनी पुन्हा एकदा रेल्वेस्थानक गर्दीने फुलू लागले आहे. मुंबई व बेंगळूर या रेल्वेसाठी प्रवाशांची सर्वांधिक गर्दी होताना दिसत आहे.                                                                                  

Related Stories

सुवर्णसौध येथे आंदोलनासाठी येणारा टेम्पो उलटल्याने भीषण अपघात

mithun mane

शेतकऱयांनी पिक विम्याचा लाभ घ्यावा

Omkar B

शंभरटक्के घरपट्टी वसुलीसाठी मनपा नियुक्त करणार पथके

Patil_p

नंदगडमधील 20 जणांची गव्हर्न्मेंट क्वॉरंटाईनमध्ये रवानगी

Patil_p

बडस येथील हॉस्पिटलला ठोकले टाळे

Amit Kulkarni

फेरीवाल्यांसाठी बाजारपेठ खुली?

Patil_p