Tarun Bharat

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये हृदयशास्त्र विभाग सेवा

Advertisements

प्रतिनिधी / कणकवली:

पडवे येथील एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटलमधील हृदयशास्त्र विभाग हा जिल्हय़ातील एकमेव हृदयशास्त्र विभाग आहे. तज्ञ डॉ. रमेश माळकर हे सदर विभागात अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, टुडी इको यासारख्या सेवा देत आहेत. सदर विभागात इतर सर्व डॉक्टरसह सर्व स्टाफ उच्च गुणवत्ताधारक असल्याचे रुग्णालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या हृदयशास्त्र विभागात आठवडय़ाचा प्रत्येक शुक्रवार यासाठी कार्यान्वित असून यावेळी अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफीसाठी दाखल होणाऱया रुग्णांना एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून दाखल केले जाते. तरी गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. आर. एस. कुलकर्णी आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी अपूर्वा पडते यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी रुग्णालयाचा रिसेप्शन 02367 – 234000, दुर्वा गंगावणे, सिद्धेश रासम, अनिल कुडपकर, गणेश झगडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे

Related Stories

रत्नागिरी एसटी विभागातील 86 कर्मचाऱयांचे निलंबन

Patil_p

निर्भिड व्यापारी महासंघ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

Patil_p

‘कोरोना’चे रुग्ण वाढतेच, आणखी चौदा पॉझिटिव्ह

NIKHIL_N

‘त्या’ महिलेचा मृत्यू आमदारांच्या अपयशी कारभाराचा बळी!

NIKHIL_N

पोक्सो अंतर्गत आरोपीला 10 वर्षांचा कारावास

NIKHIL_N

नितीन सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

NIKHIL_N
error: Content is protected !!