Tarun Bharat

लाचप्रकरणी अटकेतील डॉक्टरला जामीन मंजूर

वार्ताहर/ राजापूर

राजापूर तालुक्यातील जवळेथर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला लाच घेतल्याच्या आरोपाखाली बुधवारी अटक करण्यात आली होत़ी नुकतेच त्याला रत्नागिरी येथील न्यायालयात हजर करण्यात आली असता वैयक्ति जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आल़ी पुष्कर केरबा भिसे असे या डॉक्टरचे नाव आह़े

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजापूर तालुक्यातील जवळेथर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. पुष्पक केरबा भिसे यांनी आरोग्य केंद्रातील रूग्णवाहीका चालकाकडे महिन्याचे मानधन व हजेरीपट गटविकास अधिकाऱयांकडे पाठविण्यास साडेपाच हजार रूपयांची मागणी केली होती. याबाबत  रूग्णवाहीका चालकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलूचपत विभागाने मंगळवारी सापळा लावला होता. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास डॉ. भिसे यांना रूग्णवाहीका चालकाकडून लाच स्वीकारताना लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले.

Related Stories

कोकण रेल्वे स्थानकांचे सौंदर्यीकरण

Amit Kulkarni

..यापुढे सा.बा.खात्यातील कंत्राटी कामगार पद्धती कालबाहय़

Patil_p

कोरोना : 70 बळी, 2865 बाधित

Amit Kulkarni

‘हॅकाथॉन’ विद्यार्थ्यांसाठी सर्व क्षेत्रात रोजगारांच्या संधी निर्माण करील- मुख्य सचिव पुनीतकुमार गोएल

Amit Kulkarni

सभापतींच्या निवाडय़ास आव्हान याचिकेवर आज सुनावणी

Amit Kulkarni

विशांतने साकारली ‘गोवर्धन श्रीकृष्ण ’ माटोळी

Amit Kulkarni