Tarun Bharat

लाचप्रकरणी तत्कालीन भरणे ग्रामसेवकाचे निलंबन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

खासगी प्रॅक्टिस करणाऱया डॉक्टरकडून लाच मागितल्याप्रकरणी खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक आऱ डी. मासरकर यांचे निलंबन करण्यात आले आह़े त्यांच्याविरूद्ध लाचलुचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली होत़ी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड भरणे येथे खासगी प्रॅक्टीस करणाऱया डॉक्टरने मासरकर यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होत़ी   क्लिनिकमध्ये गर्दी होत असून त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे, अशी नोटीस मासरकर यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने देत कारवाईचा इशाराही देण्यात आला होत़ा दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी मासरकर यांनी 20 हजार रूपयांची मागणी केली होत़ी त्यानुसार डॉक्टर यांनी 10 हजार रूपये मासरकर यांना दिले व उर्वरित 10 हजार रूपयांची मागणी मासरकर यांनी केली होत़ी  तडजोडीअंती 7 हजार रूपये देण्याचे डॉक्टरांनी कबुल केले हेत़े 28 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी खेडमधील गणपती कप्पा हॉटेल येथे मासरकर यांनी डॉक्टरांना 7 हजार रूपये घेवून बोलावले हेत़े यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचून मासरकर यांच्याविरूद्ध लाचप्रकरणी कारवाई केल़ी लोकसेवक असलेल्या मासरकर यांच्यावर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आह़े

Related Stories

साताऱ्यातील तरूणाचा महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न

Archana Banage

आंबोली घाटात अज्ञात युवतीने घेतली उडी

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : आरवली येथील अपघातात दुचाकी चालक ठार

Archana Banage

जागतिक पर्यावरण दिनी तांबोळी वनबागेत बीजारोपण

Anuja Kudatarkar

16 वर्षांखालील क्रिकेट संघ निवड चाचणी

NIKHIL_N

कणकवलीत लक्झरी बसच्या अपघातात दोन ठार , तर ३० जखमी

Anuja Kudatarkar