Tarun Bharat

लाच मागितल्याप्रकरणी हिंगणीच्या ग्रामसेवकावर गुन्हा


प्रतिनिधी / सोलापूर 

साडेचार हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोहोळ तालुक्यातील हिंगणी येथील ग्रामसेवक मंगेश महेशकुमार बारगळ (वय 41, रा. शिरापूर )याच्याविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार व त्यांच्या दोन नातेवाईकांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षापूर्वी विहिरी मंजुरी झाल्या आहेत. त्या मंजूर झालेल्या विहिरीच्या कामकाजाच्या अनुषंगाने बिलाबाबतचा अहवाल तयार करून तो मस्टरसह पंचायत समिती कार्यालय मोहोळ येथे दाखल करून बिल काढण्यासाठी बारगळ यांनी साडेसात हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. पडताळणी दरम्यान तडजोडीनंतर साडेचार हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मोहोळ पोलिसात फिर्याद दिली आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक कविता मुसळे, तसेच सहाय्यक फौजदार कोळी, पोलीस कर्मचारी पकाले, पवार आदींनी केली.

Related Stories

सोलापूर : ‘डेमोक्रेटीक युथ फ्रंट’ने रोखली ‘उद्यान एक्सप्रेस’

Archana Banage

सोलापूर शहरात ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चौघांचा मृत्यू

Archana Banage

सोलापूर :पेनूरच्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू , कोरोनाचा सातवा बळी

Archana Banage

भारताला तरूणाईचे वरदान, पुढील 15 वर्षासाठी सुवर्ण संधी : डॉ. नरेद्र जाधव

prashant_c

पवारांच्या बेईनामी संपत्तीमध्ये नातेवाईकही पार्टनर

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात चंद्र दर्शन झाल्यानंतर होणार ‘रमजान ईद’

Archana Banage