Tarun Bharat

लाच स्वीकारताना सहकार खात्याचा कर्मचारी एसीबीच्या जाळय़ात

प्रतिनिधी / बेळगाव

शिवनूर, ता. अथणी येथील एका दूध उत्पादक सहकारी संघाचे बायलॉज अनुमोदन देऊन पोचपावती देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना चिकोडी सहकार खात्याच्या कार्यालयातील कर्मचाऱयाला रंगेहाथ अटक केली आहे. एसीबीच्या अधिकाऱयांनी सोमवारी ही कारवाई केली.

बाळाप्पा सिद्धाप्पा बनहट्टी हे शिवनूर दूध उत्पादक सहकारी संघाचे कार्यकारी अधिकारी आहेत. बॉयलॉजला अनुमोदन देण्यासाठी त्यांनी सहकार खात्याकडे पाठविले होते. त्यासाठी साहाय्यक निबंधक कार्यालयातील चेतन हंजी यांनी तीन हजार रुपये लाच मागितली होती.

यामुळे बाळाप्पा यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक एल. वेणुगोपाल, निरीक्षक एच. सुनीलकुमार व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी छापा टाकून लाच स्वीकारताना चेतन हंजीला अटक केली आहे.

Related Stories

‘त्या’ भाजीमार्केटबाबत न्याय द्या; नाहीतर विष द्या!

Amit Kulkarni

बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमात प्रा. पुष्पा भावेंच्या जीवनाचा आढावा

Patil_p

जलवाहिनीच्या गळतीमुळे भाताची मळणी पाण्याखाली

Omkar B

अलोककुमार यांनी केली पोलिसांच्या आरोग्याची विचारपूस

Patil_p

महामोर्चा-सायकल फेरीत शिवसैनिक बहुसंख्येने सहभागी होणार

Patil_p

जितो लेडीज विंगतर्फे योग दिन

Amit Kulkarni