Tarun Bharat

लातूर-अंबाजोगाई रोडवर बस-ट्रकचा भीषण अपघात; 6 ठार

ऑनलाईन टीम / बीड :

लातूर-अंबाजोगाई रस्त्यावर बर्दापूरजवळ आज सकाळी आठच्या सुमारास बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी लातूर-औरंगाबाद ही बस लातूरमधून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूरजवळ नंदगेपाल डेअरीजवळ एका वळणावर बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related Stories

चालकाचा ताबा सुटलेला टॅक्टर शिरला दुकानच्या कंम्पाउडमध्ये

Archana Banage

प्रताप सरनाईकांच्या लोणावळ्यातील बंगल्यावर ईडीचा छापा

Archana Banage

शिवशाहिरांना अखेरचा मुजरा…

Patil_p

अमेरिकेत 39.50 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

दत्तात्रय पाटोळे खूनप्रकरणी पाचजणांना नऊ दिवस पोलिस कोठडी : चौकशीसाठी काहीजण ताब्यात

Archana Banage

सातारा : 67 जण झाले कोरोनामुक्त, तिघांचा बळी

Archana Banage