Tarun Bharat

लादेनचा खात्मा करणारे शूर आयटीबीपीमध्ये

Advertisements

विशेष प्रजातीचे 17 श्वान सुरक्षा दलामध्ये सामील – बळ वाढणार

वृत्तसंस्था / पंचकूला

भारत-तिबेट बॉर्डर पोलीस दलाला (आयटीबीपी) स्वतःच्या के9 पथकासाठी 17 नवे योद्धे मिळाले आहेत. हे शूरवीर बेल्जियन मलिनुआ प्रजातीच्या श्वानाची पिल्ले आहेत. या विशेष प्रजातीच्या श्वानाला अल कायदाचा क्रूरकर्मा दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱया अमेरिकेच्या नेवी सील टीममध्ये सामील करण्यात आले होते. या प्रजातीचे श्वान अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाइट हाउसचीही सुरक्षा करतात.

या श्वानांना पंचकूलाच्या नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर ड्रॉग्समध्ये ठेवण्यात आले आहे, तेथे त्यांचे मोठे आदरातिथ्य होत आहे. या पिल्लांना ओल्गा आणि ओलेश्या या श्वानांनी काही दिवसांपूर्वीच जन्म दिला आहे.

17 पिल्लांना जन्म

ओल्गा आणि ओलेश्या आयटीबीपीच्या दिग्गज योद्धय़ा असून सध्या आयटीबीपीच्या के9 ब्रीडिंग सेंटरमध्ये मातृत्वाचा आनंद घेत आहेत. ओल्गा आणि ओलेश्या दोन्ही बहिणी 5 वर्षीय असून त्यांच्या पिल्लांचा पिता गाला देखील आयटीबीपीच्या पथकात सामील असल्याचे सांगण्यात आले. ओल्गाने 9 तर ओलेश्याने 8 पिल्लांना जन्म दिला आहे. त्यांचा जन्म 30 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी झाला आहे.

बेल्जियन मलिओना प्रजाती

दोन्ही श्वानांनी स्वतःच्या कारकीर्दीत अनेकदा आयईडीचा शोध लावून कित्येकांचा जीव वाचविला आहे. आनुवांशिक दृष्टय़ा हे सर्वोत्तम श्वान आहेत. पिल्लांमध्ये स्वतःच्या आईप्रमाणेच निडर, उत्साही आणि गंध घेण्याची क्षमता पुरेपूर असल्याची माहिती डीआयजी (वेट) सुधाकर नटराजन यांनी दिली आहे. बेल्जियन मलिनोआ श्वानांची उंची 24 ते 26 इंच असते. तर यांचे वजन 18 ते 27 किलोग्रॅमपर्यंत असते. तसेच त्यांचे सरासरी वयोमान 14 ते 16 वर्षांदरम्यान असते.

लादेनचा लावला होता शोध

बेल्जियन मलिनोआ वंशाच्या श्वानाचा वापर पाकिस्तानात ओसामा ऑपरेशनमध्येही करण्यात आला होता. 2 मे 2011 रोजी अमेरिकन नेवी सीलने पाकिस्तानात ऑपरेशन नेप्टय़ून स्पीयर साकारून ओसामा बिन लादेन आणि त्याच्या सहकाऱयांचा खात्मा केला होता. या पथकासोबत बेल्जियन मलिनोआ श्वानही होते, त्यांनीच ओसामाचे ठिकाण शोधून काढले होते. नेवी टीमध्ये सामील बेल्जियन मलिनोआ प्रजातीच्या श्वानाचे नाव ‘काहिरा’ होते, ज्याने मोहिमेदरम्यान लादेनची ओळख पटविली होती.

Related Stories

पश्चिम बंगाल : कॅन्टोन्मेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत वाढवले लॉकडाऊन

Tousif Mujawar

62,500 बुलेटप्रूफ जॅकेट्स खरेदी करणार

Patil_p

राजस्थानमध्ये राजकीय पेचप्रसंग तीव्र

Patil_p

सद्यस्थितीत बूस्टर डोसची गरज नाही !

Amit Kulkarni

उत्तराखंड : पिथोरागड आणि बागेश्वर जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के

Tousif Mujawar

उत्तराखंडमध्ये 47 नवे कोरोना रुग्ण; एकूण संख्या 3300 पार

Tousif Mujawar
error: Content is protected !!