Tarun Bharat

लार्सन टुब्रोला मिळाले कंत्राट

Advertisements

नवी दिल्ली

 पायाभूत सेवा क्षेत्रात कार्य करणाऱया लार्सन अँड टुब्रो कंपनीला रेल विकास निगमचे कंत्राट नुकतेच मिळाले आहे. हे मिळालेले कंत्राट 5 हजार कोटींचे उत्तराखंडमध्ये रेल्वेलाइन कामाचे असल्याचे एल अँड टीने सांगितले आहे.  ऋषिकेश ते करणप्रयागदरम्यानच्या मार्गावर ब्रॉडगेज लाइन टाकण्याचे कंत्राट कंपनीला प्राप्त झाले आहे. याअंतर्गत बोगदे खणणे, बांधणे व इतर रेल्वे लाइनसंबंधीची कामे लार्सन आणि टुब्रोला करावी लागणार आहेत. सदरच्या प्रकल्पाचे काम 60 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जाणार आहे. या मार्गामुळे उत्तराखंडमधील पर्यटनाला चालना मिळणार असून आजुबाजुच्या भागांचाही विकास होणार आहे.

Related Stories

आत्मनिर्भर भारत योजनेतून एमएसएमईला लाभ सुरु

Patil_p

8 कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1 लाख कोटींची वृद्धी

Patil_p

विदेशी चलन साठय़ात वाढीची नोंद

Patil_p

वन प्लसचा भारतात गुंतवणुकीचा निर्णय

Patil_p

गव्हाची विक्रमी खरेदी

Patil_p

सेन्सेक्समधील तेजीला अखेर विराम!

Patil_p
error: Content is protected !!