Tarun Bharat

लालबहाद्दुर शास्रीनगर येथील रहिवासी बेपत्ता

एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर

 प्रतिनिधी / बेळगाव

वैभवनगर जवळील लालबहाद्दुर शास्रीनगर येथील एक रहिवासी गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या मुलाने एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

तुकाराम मारुती सुतार (वय 56) असे त्याचे नाव आहे. दि. 20 मार्च रोजी सकाळी 7 वाजता तुकाराम आपल्या घराबाहेर पडला आहे. त्याला दारुचे व्यसन जडले असून दोन ते तीन महिन्यांतून एकदा घर सोडून जातो. जातो तसा परतही येतो. म्हणून कुटुंबियांनी उशीरा फिर्याद दाखल केली आहे.

5 फूट उंची. गहू वर्ण, अंगाने सुदृढ असे त्याचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना त्याने आपल्या अंगावर पांढरा शर्ट व काळी पॅन्ट परिधान केला असून तुकाराम कन्नड, मराठी,हिंदी भाषा बोलतो. तुकाराम विषयी कोणाला माहिती मिळाल्यास एपीएमसी पोलीस स्थानकाशी 0831-2405250 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

उद्यमबाग, मच्छे-खानापूर परिसरात आज वीजपुरवठा ठप्प

Patil_p

यळेबैल येथे दुर्गामाता मूर्तीची मिरवणूक

Amit Kulkarni

जनतेचे नुकसान झाल्यास अधिकाऱयांवर कारवाई

Patil_p

ई-छावणीद्वारे कर भरणाऱयांना मिळणार पाच टक्के सवलत

Amit Kulkarni

अवैधरीत्या वाहतूक करणाऱया 22 लाख किमतीची दारू नष्ट

Patil_p

पीडीओ गणेश यांचा बेंगळूर येथे सन्मान

Omkar B
error: Content is protected !!