Tarun Bharat

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी फरार असणारा दीप सिद्धू अटकेत

नवी दिल्ली/प्रतिनिधी

दिल्लीत नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी दोन महिन्याहून अधिक काळ आंदोलन करत आहेत. दरम्यान प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी निषेध म्हणून ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार दीप सिद्धूला अटक केली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्ल्याकडे नेण्याचा आरोप असलेल्या अभिनेता दीप सिद्धूला पोलिसांनी आज अटक केली. हिंसाचार झाल्यानंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. शेतकरी नेत्यांनीही त्याच्यावर आरोप केले होते. आरोप झाल्यानंतर तो फरार झाला होता. तब्बल १४ दिवसांनंतर सिद्धूला अटक करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीमध्ये हिंसाचार झाला होता. नवीन कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी लालकिल्ल्यावर निशाण साहिब धार्मिक ध्वज फडकावला होता. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर अभिनेता दीप सिद्धू याचं नाव समोर आलं होतं. दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला होता. त्याचबरोबर दीप सिद्धूला अटक करण्याची मागणीही सातत्यानं केली जात होती. अखेर त्याला अटक दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

Related Stories

अग्निपथ, महागाईवरून संसदेत ‘रण’ पेटणार

Patil_p

फटाका कारखान्यात उत्तरप्रदेशमध्ये स्फोट

Patil_p

कोरोना विरोधातील देशाचा ‘नायक’

Patil_p

विमानात तांत्रिक बिघाड नव्हता!

Patil_p

LOC वर भारतीय जवानांनी पाडले पाकिस्तानी क्वाडकॉप्टर

datta jadhav

निर्भया : दोषींची फाशी पुन्हा लांबणीवर ?

tarunbharat